Home > News Update > राहुल गांधींच्या निर्णायामुळे मोदींची गोची झाली आहे का?

राहुल गांधींच्या निर्णायामुळे मोदींची गोची झाली आहे का?

राहुल गांधींच्या निर्णायामुळे मोदींची गोची झाली आहे का?
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोव्हीड - १९ च्या परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक असल्यानं पश्चिम बंगालचा निवडणूक दौरा रद्द केला आहे. मात्र, पंतप्रधानांच्या या दौऱा रद्द करण्यामागचं कारण वेगळं सांगितलं जात आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष आणि कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आपण पश्चिम बंगाल विधानसभेसाठी प्रचार करणार नसल्याचं जाहीर केलं आहे. राहुल गांधी यांच्या या घोषणेनंतरही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी सभा घेतल्या. या सभा घेतल्यानंतर मोदी आणि अमित शहा यांच्यासह भाजपवर मोठ्या प्रमाणात टीका ही झाली. त्यानंतर मोदी यांनी आज त्यांच्या प्रचार सभा कोव्हिड च्या संदर्भात मीटिंग असल्याने उद्यापर्यंत स्थगित केल्याचं जाहीर केलं आहे.

मोदींना हा निर्णय राहुल गांधींच्या निर्णयामुळं घ्यावा लागल्याचं जाणकार सांगत आहे

१८ एप्रिलला राहुल गांधी यांनी आपल्या बंगालमधील सर्व प्रचार सभा रद्द करण्याबाबत ट्विट करत माहिती दिली होती. कोविडचे संकट पाहता मी पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व सभा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

अशा वेळी या मोर्चांमधून राजकीय पक्षांनी जनतेला आणि देशाला होणार्‍या धोक्याचा विचार केला पाहिजे.

राहुल गांधींच्या या निर्णयामुळेच मोदींना त्यांच्या सभा रद्द करण्याची नामुष्की आल्याचं जाणकार सांगत असून मोदी यांनी आज सभा रद्द करण्यासंदर्भात ट्वीट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. ते म्हणतात

उद्या कोविड -१९ च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठका घेणार आहेत. यामुळे मी पश्चिम बंगालला जाणार नाही.

पंतप्रधानांनी बंगाल दौरा रद्द केल्यानंतर पश्चिम बंगालमधील भाजपच्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रचार सभा ही रद्द करण्यात आल्या आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या प्रचार सभा देखील रद्द करण्यात आल्या आहेत.

यापूर्वी भाजपाने असे म्हटले होते की जास्तीत जास्त 500 लोकांच्या उपस्थितीत बैठका होतील. मात्र, आता फक्त गरज पडल्यास जिल्हा स्तरावर सभा घेण्यात येतील. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आहे.

पंतप्रधान मोदींना बंगालमध्ये चार प्रचार सभांमध्ये सहभाग घ्यायचा होता. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सुद्धा गुरुवारी आपल्या तीनपैकी दोन प्रचारसभा रद्द केल्या आणि पहिल्या रॅलीमध्ये प्रचार केल्यानंतर दिल्लीत परतण्याचा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांना प्रचारासाठी आपला पश्चिम बंगाल दौरा रद्द करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान तसेच अन्य भाजपचे नेते आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सभांमध्ये प्रचंड प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. यामुळे कोरोना संक्रमणाचा मोठ्याप्रमाणात प्रसार होण्याचा धोका वाढला आहे.

दरम्यान मोदींवर मोठ्या प्रमाणात टीका होत असताना कोरोनाच्या काळात ऑक्सिजनचा पुरवठा व उपलब्धता या विषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुरुवारी दिल्लीतही उच्चस्तरीय बैठक घेतली. गुरुवारी झालेल्या या बैठकीत अधिकाऱ्यांनी पंतप्रधानांना गेल्या काही आठवड्यांत ऑक्सिजनचा पुरवठा सुधारण्याच्या प्रयत्नांविषयी माहिती दिली.

या बैठकीत पंतप्रधानांनी ऑक्सिजनचे उत्पादन वाढविणे, ऑक्सिजन पुरवठ्यासंबंधी वेग वाढविणे आणि आरोग्य सुविधांना नाविन्यपूर्ण मार्गाने ऑक्सिजनचा पुरवठा करणे या बाबींवर तातडीने कार्य करण्याची गरज व्यक्त केली.

Updated : 22 April 2021 9:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top