शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत पंतप्रधान मोदींनी बोलवाली बैठक, सरकार माघार घेणार का?
X
नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसोबत चर्चेची पाचवी फेरी आज होणार आहे. पण या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनावर काय तोडगा काढता येईल यावर चर्चा झाली असल्याची माहिती एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेली आहे. या बैठकीला केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल हे उपस्थित होते.
या बैठकीमध्ये सध्या शेतकऱ्यांसोबत सुरू असलेल्या चर्चेची पूर्ण माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आल्याचे समजते आहे. दरम्यान आक्रमक झालेल्या शेतकरी संघटनांनी केंद्र सरकारने नवीन कृषी कायदे मागे घेतल्याशिवाय माघार घेणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. शेतकरी संघटनांनी आणखी आक्रमक भूमिका घेत ८ डिसेंबर रोजी देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. या बंदला कामगार संघटनांनीही भूमिका घेतली आहे.