ज्या सरकारचा जन्म खोक्यातून झालाय तो आमची काय चौकशी करणार – उद्धव ठाकरे
पीएम केअर फंडाचीही चौकशी झाली पाहिजे
X
मुंबई – शिवसेनेचे (उबाठा) नेते उद्धव ठाकरे आणि शिंदे-फडणवीस सरकारमधील वाक् युद्ध अजूनही सुरूच आहे. आज दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे आज शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे मुंबई पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठक बैठक पार पडली. यात ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारसोबतच केंद्र सरकारवरही टीका केलीय.
शिंदे-फडणवीस सरकावर टीका करतांना की, "मी नायक की खलनायक हे जनता ठरवेल, पण तुम्ही नालायक आहात हे, मात्र जनतेला पक्क माहीत आहे, असा टोला लगावला. ठाकरे यांनी मुंबई महानगरपालिकाची चौकशी जरूर करा आम्ही घाबरत नाही, परंतु ते करत असताना ठाणे महानगरपालिका , पिंपरी-चिंचवड, पुणे, नागपूर महानगरपालिकेचीही चौकशी करण्याची मागणी केली. त्याच बरोबर तुमच्यात हिम्मत असेल तर काश्मीर ते कन्याकुमारी सर्व राज्यांची चौकशी करा, आणि पीएम केअर फंडाचीही चौकशी करण्याची मागणी ठाकरे यांनी केली. ते पुढे म्हणाले की,” ज्या सरकारचा जन्म खोक्यातून झालाय तो आमची काय चौकशी करणार ? अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारला टोला लगावला.
उद्धव ठाकरे यांनी समान नागरी कायद्यावर बोलतांना सांगितले की,” समान नागरी कायद्यानुसार आम्ही सुद्धा मागणी करतो ईडी, सीबीआय, इनकम टॅक्सचा वापर करण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा द्या. आम्ही सांगतो त्यांच्यावर धाडी टाका. राहुल गांधी आणि केजरीवाल यांनी प्रश्न विचारले त्या पैशांचे काय झाले? त्याचं उत्तर सरकारने दिल नसल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.
भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्यावरही ठाकरे यांनी टीका केली. ते म्हणाले,” छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती आणि हे उपरे तिकडे वर बसले आहेत. ते मराठ्यांची राजधानी लुटत आहेत. माझ्याकडे चिन्ह नाही, पक्ष नाही, तरी देखील उद्धव ठाकरे... उद्धव ठाकरे करत असतात. नड्डा ओडीसात गेले तिकडे उद्धव ठाकरे यांच्यावर बोलतात, यांना काही बोललं की यांचा नड्डा सुटतो, असा मिश्किल टोमणाही ठाकरे यांनी भाजपला लगावला.
हिंदुत्वाच्या मुद्यावर बोलताना ते म्हणाले,” आम्ही हिंदुत्व सोडलं नाही, सोडणारही नाही. पण तुमचा बेगडी हिंदुत्वाचा बुरखा फाडल्याशिवाय राहणार नाही नसल्याचा इशाराच भाजपला दिला आहे. काही दिवसांपूर्वी ठाण्यात एका शिवसेना महिलेला मारहान केली होती त्यावर बोलताना सांगितले की, “ शिवसैनिकांवर हात उठला तर जागेवर ठेवायचा नाही असा आदेशच ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिलाय.