मिरज शहरातील रस्त्यावर खड्डेच - खड्डे ; राष्ट्रवादी आक्रमक
X
मिरज शहरातील रस्त्यात पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले असून भाजपचे आमदार सुरेश खाडे यांच्या प्रतिमेस चिखलाचे पाणी घालून राष्ट्रवादीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार खाडे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. रस्त्यात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. मात्र खड्ड्यांची दुरुस्ती होत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केले आंदोलन.
मिरज शहर मिशन हॉस्पिटल चौक या ठिकाणी मिरज विधानसभा क्षेत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष प्रमोद इनामदार आणि मिरज रिक्षा चालक-मालक संघटना अध्यक्ष मन्सूर नदाफ यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
दरम्यान येत्या आठ दिवसांमध्ये जर मिरज शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आली नाही तर आमदारांचे निवासस्थान किंवा कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.