Home > News Update > पिंपरी चिंचवड घोटाळा : "निष्पक्ष चौकशी करा" संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना नाव न घेता सल्ला

पिंपरी चिंचवड घोटाळा : "निष्पक्ष चौकशी करा" संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना नाव न घेता सल्ला

पिंपरी चिंचवड घोटाळा : निष्पक्ष चौकशी करा संजय राऊत यांचा किरीट सोमय्यांना नाव न घेता सल्ला
X

पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गातील कंत्राटांमध्ये ५०० कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची कागदपत्रे दोन दिवसांपुर्वी संजय राउत यांनी किरीट सोमय्यांना पाठवली होती. या प्रकरणाची देखील चौकशी करा असं पत्रच त्यांनी लिहीलं होतं. क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि आणि आर्क्स या कंपन्यांचा त्यात सहभाग असल्याचे संजय राउत यांनी सांगितले होते.

या प्रकरणावर आज संजय राउत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, "जे घोटाळे समोर येत आहेत ते 2018 ते 2019 मध्ये झाले आहेत. पंतप्रधान नरेंद मोदी यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मोठा घोटाळा झाला आहे. त्यामध्ये कोण आहे? कोणत्या मोठया नेत्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या क्रिस्टल कंपनीला नियम धाब्यावर बसवून घोटाळा झाला आहे? त्याची चौकशी झाली पाहिजे. जे घोटाळे उघड करत आहेत त्यांना त्याची कागदपत्रे दिली आहेत त्यांनी यावर अभ्यास करावा. भ्रष्टाचाराला कोणताही राजकीय पक्ष, धर्म,जात नसते, तो भ्रष्टाचारच असतो." असं म्हणत त्यांनी किरीट सोमय्या यांच्यावर नाव न घेता टीका केली.


Updated : 22 Oct 2021 1:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top