Home > News Update > नंदुरबार मध्ये वराहांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण : चार हजार वरहांचे किलिंग..

नंदुरबार मध्ये वराहांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण : चार हजार वरहांचे किलिंग..

नंदुरबार मध्ये वराहांना आफ्रिकन स्वाईन फ्लूची लागण : चार हजार वरहांचे किलिंग..
X

नंदुरबार जिल्ह्यातील म्हसावद येथे गेल्या आठवड्यात शंभराहून अधिक वराहांना मृत्यू आफ्रिकन स्वाइन फिव्हरमुळे झाल्याचा अहवाल भोपाल येथील प्रयोगशाळेने दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. जिल्हा प्रसासनाने म्हसावद येथील एक किमी क्षेत्र बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून, पशुसंवर्धन विभागाने, गुरुवारी चार हजार डुकराचे कलिंग केले. या संसर्गाचा मानवाला कुठलाही धोका नसल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटलं आहे.

आफ्रिकन स्वाईन फ्लू मुळेच वराहांचा मृत्यू -

शहादा तालुक्यातील म्हसावद परिसरात मागील आठवड्यात एका मागोमाग १०० हून अधिक वराहांचा मृत्यू झाला होता. एकाचवेळी एवढ्या वराहांचा

मृत्यू झाल्याने जिल्हा पशुसंवर्धन विभागाने मृत आणि उपचार सुरू असलेल्या वराहांच्या रक्ताचे नमुने संकलित करुंन पुणे आणि भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठवण्यात आले होते त्याचा अहवाल पशुसंवर्धन विभागाला प्राप्त झाला. यात आफ्रिकन स्वाइन फिव्हर मुळे या वराहांचा मृत्यू झाल्याचा आढळून आले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने खबरदारी घेत उपायोजना सुरू केल्या. नंदुरबार जिल्ह्यातील काही भागातील वराहांचेनमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत त्याचा रिपोर्ट प्रशासनाकडे प्राप्त झाला नाही

आफ्रिकन स्वाइन फिव्हर संसर्गजन्य मानवला धोका नाही -

आफ्रिकन स्वाइन फिव्हर हा घरगुती आणि जंगली वराहांमध्ये आढळणारा संसर्गजन्य रोग आहे. ज्याचा मृत्यू दर १००% पर्यंत पोहोचू शकतो. हा मानवी आरोग्यासाठी धोकेदायक नाही; परंतु वराहारच्या लोकसंख्येवर त्याचा परिणाम होतो. हा विषाणू कपडे, बूट, चाके व इतर सामग्रीवर जिवंत राहतो.

गेल्या काही वर्षांपूर्वी नंदुरबार जिल्ह्यात कोंबड्यावर बर्ड फ्लू आला होता त्यावेळी मोठ्या प्रमाणावर कोंबड्यांची किलिंग करण्यात आली होती.

Updated : 16 Feb 2024 4:47 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top