Home > News Update > Phone Tapping : गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? सजंय राऊत यांचा सवाल

Phone Tapping : गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? सजंय राऊत यांचा सवाल

पुण्याच्या तात्कालिन रश्मी शुक्ला यांनी राज्यातील विरोधी पक्षाच्या नेत्यांचे फोन टॅप केले होते. त्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापाठोपाठ गोव्यातही फोन टॅप झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

Phone Tapping : गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? सजंय राऊत यांचा सवाल
X

राज्यात महाविकास विरुध्द भाजप सामना रंगला आहे. त्यातच रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅप केले, असा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला आहे. त्यापाठोपाठ गोव्यातही फोन टॅपिंग झाल्याचा आरोप करत गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

राज्यात फोन टॅपिंग प्रकरण चांगलेच गाजले होते. त्याप्रकरणी पुण्याच्या तात्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र त्यापाठोपाठ गोव्यातील नेत्यांचेही फोन टॅप केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. त्याबरोबरच गोव्यातील रश्मी शुक्ला कोण? असा सवाल राऊत यांनी केला आहे.

संजय राऊत यांनी ट्वीट करत म्हटले आहे की, गोव्यात फोन टॅपिंग चा महाराष्ट्र पॅटर्न सुरु आहे. त्यातच सुदिन ढवळीकर,विजय सरदेसाई दिगंबर कामत गिरीश चोडणकर यांचे फोन टॅपिंग सुरू आहे. त्यामुळे गोव्यातील रश्मी शुक्ला कोण असा सवाल संजय राऊत यांनी ट्वीटमधून केला आहे. त्यामुळे राज्यासह गोव्यात खळबळ उडाली आहे.

पुण्याच्या तात्कालिन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी 18 सप्टेंबर 2017 ते 14 नोव्हेंबर 2018 या कालावधीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी खासदार संजय काकडे, माजी आमदार अशिष देशमुख आणि मंत्री बच्चू कडू यांचे फोन टॅप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याप्रकरणी पोलिस महासंचालक संजय पांडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. त्यामध्ये रश्मी शुक्ला दोषी आढळल्या. त्यामुळे या फोन टॅपिंग प्रकरणात रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर या प्रकरणाचा संबंध देवेंद्र फडणवीस यांच्याशी लावला जात आहे. मात्र त्यापाठोपाठ गोव्यातही फोन टॅप झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. तसेच गोव्याच्या रश्मी शुक्ला कोण असा प्रश्न उपस्थित केला आहे.


Updated : 5 March 2022 11:52 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top