भारतात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ
X
मुंबई : भारतात सलग सहाव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे दर कडाडल्यामुळे ही दरवाढ झाली आहे. इंडियन ऑईल, HPCL आणि BPCL या भारतीय पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर करत पेट्रोलच्या दरात 30 पैसे तर डिझेलच्या दरात 47 पैशांनी वाढ केली आहे. या इंधन दरवाढीमुळे मुंबई आणि दिल्लीत इंधनाची किंमत विक्रमी पातळीवर पोहोचली आहे.
पेट्रोलियम कंपन्यांनी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 110.13 रुपये तर डिझेलचा प्रतिलीटर दर 100.76 रुपये इतका झाला आहे. पुण्यात आज पेट्रोलसाठी 109.62 रुपये मोजावे लागणार आहे तर डिझेलसाठी 98.63 रुपये मोजावे लागत आहेत. दरम्यान, पॉवर पेट्रोलला प्रतिलीटरसाठी 113.30 रुपये मोजावे लागत आहेत. तर दिल्लीत पेट्रोल 104.14 रुपये
आणि डिझेल 92.82 रुपये प्रतिलीटर झाले आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. मुंबईत डिझेलने काल 100 रुपयांचा विक्रमी टप्पा ओलांडला होता. तर दिल्लीत पेट्रोलच्या दराने पहिल्यांदाच 104 रुपयांची पातळी ओलांडली आहे.