Supreme court : न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका
X
न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड (Justice Dy Chandrachud) यांची देशाचे 50 वे सरन्यायाधीश (chief justice) म्हणून निवड झाली आहे. मात्र सरन्यायाधीश पदाचा पदभार घेण्यापुर्वीच न्यायमुर्ती धनंजय चंद्रचचूड यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात (supreme court) याचिका दाखल करण्यात आली होती.
न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड हे 9 नोव्हेंबर रोजी सरन्यायाधीश पदाची शपथ (oath of chief justice) घेणार आहेत. त्यापुर्वीच त्यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेत धनंजय चंद्रचूड यांच्यावर त्यांचा मुलगा ॲड. अनिकेत चंद्रचूड (Adv. Aniket chandrachud) याला खटल्यामध्ये मदत केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांना शपथ घेण्यापासून रोखण्याची विनंती केली याचिकाकर्त्याने केली होती. मात्र ही याचिका सरन्यायाधीश उदय लळीत (CJI Uday lalit) यांच्या खंडपीठाने फेटाळून लावली.
न्यायमुर्ती धनंजय चंद्रचुड यांना सरन्यायाधीश पदाची शपथ घेण्यापासून रोखण्याबाबत याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेमध्ये कोणतेही तथ्य दिसत नसल्याचे मत सरन्यायाधीश उदय लळीत यांनी मांडले. यासह न्यायमुर्ती धनंजय चंद्रचूड यांच्याविरोधातील याचिका सरन्यायाधीश उदय लळीत यांनी फेटाळून लावली.