Home > News Update > #restore_MaxMaharashtra - मॅक्स महाराष्ट्रला वाढता पाठिंबा

#restore_MaxMaharashtra - मॅक्स महाराष्ट्रला वाढता पाठिंबा

#restore_MaxMaharashtra -  मॅक्स महाराष्ट्रला वाढता पाठिंबा
X

मंगळवारी कम्युनिटी गाईडलाईन्सच उल्लंघन केल्याच्या नावाखाली youtube ने मॅक्स महाराष्ट्रचं चॅनल डिलीट केलं. जळगावातील दलित मुलांना नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडीओ २०१८ साली मॅक्स महाराष्ट्रने अपलोड केला होता. त्या व्हिडीओचा आधार घेत यु ट्युब ने आता चॅनेलवर कारवाई केली आहे. युट्युब च्या या कारवाईचा निषेध अनेकांनी आतापर्यंत केला आणि मॅक्स महाराष्ट्रला पाठिंबा दिला. दिवसेंदिवस हा आकडा वाढत चालला आहे. अनेत दिग्गज व्यक्तींनी मॅक्स महाराष्ट्रच्या समर्थनार्थ आपापल्या सोशल मिडीया हँडल्स वर पोस्ट केल्या आहेत.

इ. झेड. खोब्रागडे निवृत्त भाप्रसे अधिकारी यांनी देखील मॅक्स महाराष्ट्रवर युट्युबने केलेल्या या कारवाईचा निषेध नोंदवला आहे. "मॅक्स महाराष्ट्र हे सर्व सामन्याचे, शोषित वंचितांच्या जगण्याचे प्रश्न निर्भयपणे मांडणारे चॅनेल आहे. रवींद्र आंबेकर व टीम यांची पत्रकारिता लोकशाही ला मजबूत करणारी आहे. समाजहिताचे जे विषय mainstream मीडिया चॅनेल वर चर्चेला आले पाहिजेत परंतु येत नाहीत असे सर्व विषय मॅक्स महाराष्ट्रावर चर्चेला येतात.सत्य सांगणे हे मीडिया चे काम आहे म्हणूनच संविधानाने मीडियाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे.

सत्य मांडले, खरी स्टोरी केली म्हणून काहीतरी कारण देऊन ,चॅनेल बंद पाडणे हे चुकीचे आहे. यामागे काहींचे षडयंत्र ही असू शकते. एकीकडे सत्यमेव जयते म्हटले जाते आणि दुसरीकडे सत्य सांगितले तर चॅनेल बंद पाडले जाते.खऱ्यांचा आवाज दाबला जातो. संविधानिक मूल्ये पायदळी तुडविले जाण्याचे प्रकार वाढलेत. सर्व क्षेत्रात हे घडत आहे. हे सर्व अन्यायकारक आहे, असंविधानिक आहे. तेव्हा बंदी हटवून मॅक्स महाराष्ट्र लवकर सुरू करण्यात यावा. श्री रवींद्र आंबेकर आणि टीम यांचे सोबत आम्ही आहोत."

शिवाय सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU)चे उपाध्यक्ष डॉ. डी एल कराड यांनी देखील आपल्या सदिच्छा संरपादक रविंद्र आंबेकपर यांच्याकडे व्यक्त केल्या आहेत.

"प्रिय रवींद्र

आम्ही तुझ्या सोबत आहोत .

YouTube ची कारवाई लोकशाही विरोधी आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे दडपशाही आहे.

हा आमच्या घटनात्मक अधिकारांवर थेट हल्ला आहे.

संविधानासाठी उभे राहणाऱ्या आपल्या सर्वांसमोर हे एक आव्हान आहे.

सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU)चे आम्ही एक कोटीहून अधिक सदस्य या प्रवृत्तीच्या विरोधात रस्त्यावर उतरत आलेलो आहोत.

आम्ही मॅक्स महाराष्ट्र आणि टीम सोबत या संघर्षात उभे आहोत." -

शिवाय कायद्याने वागा लोकचळवळीचे संस्थापक राज असरोंडकर यांनी देखील फेसबुक पोस्ट मधून मॅक्स महाराष्ट्रला पाठिंबा दिला आहे.

"Max Maharashtra चा आवाज दडपणं हे एकप्रकारे सामान्यातल्या सामान्य नागरिकांचा न्यायहक्कांसाठीचा आवाज दडपणं आहे. YouTube लवकर भानावर या ! #Restore_MaxMaharashtra"

तर प्रसिध्द तरूण साहित्यिक वैभव छाया यांनी देखील मॅक्स महाराष्ट्रवर झालेल्या कारवाईविषयी ट्विटर वर youtube ला जाब विचारला आहे.

प्रिय YouTube,

जातीवाचक वागू नका. MaxMaharashtra तातडीने पुन्हा सुरू करा.

अत्याचाराची बातमी करणे हे समाजात सामाजिक न्याय मजबूत करणारे कार्य आहे.

या व्यतिरीक्त राजकीय दर्शन या एका युट्युब चॅनेल ने देखील मॅक्स महाराष्ट्रला पाठिंबा दर्शवला आहे.

Updated : 8 Sept 2022 7:14 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top