'जिनके घर शीशे के होते हैं, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते' सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली...
X
सर्वोच्च न्यायालयाने आज शुक्रवारी परमबीर सिंह यांची याचिका फेटाळली. या याचिकेद्वारे परमबीर सिंह यांनी हे प्रकरण महाराष्ट्राबाहेरील तपास यंत्रणेकडे द्यावे. अशी मागणी केली होती. यावर सर्वोच्च न्यायालयाने "ज्यांचे घर काचेचे असते ते दुसऱ्यांवर दगड फेकत नाही" असं महत्वाचं निरीक्षण नोंदवत ही याचिका फेटाळली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने वकील महेश जेठमलानी यांना सवाल करत 30 वर्ष महाराष्ट्र पोलिसांची सेवा केली तरीही तुमचा राज्य पोलिसांवर तुमचा भरोसा का नाही? ही विचित्र गोष्ट आहे. असा थेट सवाल केला यावर वकील महेश जेठमलानी यांनी परमबीर सिंह यांना तपास अधिकाऱ्यांकडून त्रास दिला जात असल्याचं सांगितलं. यावेळी महेश जेठमलानी यांनी याचिका परत घेण्यासाठी परमबीर सिंह यांना धमकावलं जात असल्याचं देखील न्यायालयाला सांगितलं. तरीही न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
काय आहे प्रकरण?
पोलिस सेवेत असताना परमबीर सिंह यांनी माझा छळ केला. असा आरोप पोलीस निरीक्षण भीमराव घाडगे यांनी केला आहे. या तक्रारीनंतर ठाणे पोलिसांनी परमबीर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. यावर राज्य पोलिस आता चौकशी करत आहे. ही चौकशी राज्याबाहेरील तपास यंत्रणांनी करावी. अशी मागणी करणारी याचिका परमबीर सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती. न्यायालयाने ती फेटाळली आहे.
उच्च न्यायालयात जाण्याची परवानगी...
सर्वोच्च न्यायालयाने यावेळी परमबीर सिंह यांना आपण मेरिटवर बोला. जर तुम्हाला तात्काळा या प्रकरणावर सुनवाई हवी असेल तर तुम्ही उच्च न्यायालयात जाऊ शकता. असं न्यायालयाने म्हटलं आहे. दरम्यान परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी खंडणीचा आरोप लावला आहे. त्यामु