पेगॅसिस प्रकरणावरुन आज सर्वाच्च न्यायालयात महत्वाची सुनावणी
संसदेच्या पावसाळी आधिवेशनात वादाचा मुद्दा ठरलेल्या आणि सध्या सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरु असलेल्या पेगासिस स्पायवेअर हेरगिरीप्रकरणाची महत्वाची सुनावणी आज सर्वाच्च न्यायालयात पार पडणार आहे. केंद्र सरकारनं प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी वेळ वाढवून घेतल्यानं या प्रकरणाची सुनावणी लांबली होती.
X
नेत्यांसह पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांची हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची दखल घेऊन न्यायालयाने विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधिशाच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.पेगासिस स्पायवेअरच्या मदतीने मोबाईल हॅक करून यंत्रणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे केंद्राने किंवा कोणा सरकारी यंत्रणेने पेगासिस स्पायवेअरचा वापर करण्यासाठी परवानागी घेतली होती का? असे याचिकार्त्यांचे प्रश्न आहेत.
याबाबतही सरकारने भुमिका मांडावी अशी विरोधकांची मागणी आहे. या मुद्दावरुन सातत्याने विरोधक लोकसभा आणि राज्यसभेत आवाज उठवला होता. आता या प्रकरणाची सर्वाच्च न्यायालयात सुनावणी सुरु आहे. यापुर्वीच्या सुनावणीमधे सुप्रिम कोर्टानं राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड होता कामा नये असे सांगितले होते. केंद्र सरकारने याचिकार्त्यांचे सर्व आरोप यापूर्वीच फेटाळले आहेत.