Home > News Update > पेगासीस प्रकरण गंभीर; सुप्रिम कोर्ट

पेगासीस प्रकरण गंभीर; सुप्रिम कोर्ट

प्रसिध्द माध्यमांमधे आलेली वृत्तं खरी असली तर पेगासीस हेरगिरी प्रकरण गंभीर दिसत असून सुप्रिम कोर्टात याचिका दाखल करण्यापूर्वी पोलिसात गुन्हा का दाखल केला नाही? असे सांगत सुप्रिम कोर्टानं आता पेगासीस हेरगिरी प्रकरणाची सुनावणी पुढील मंगळवारी ठेवली आहे.

पेगासीस प्रकरण गंभीर; सुप्रिम कोर्ट
X

नेत्यांसह पत्रकार आणि प्रतिष्ठित नागरिकांची हेरगिरी केल्याच्या प्रकरणाची दखल घेऊन न्यायालयाने विद्यमान किंवा सेवानिवृत्त न्यायाधिशाच्या देखरेखीखाली स्वतंत्रपणे चौकशीची मागणी त्यांनी केली आहे.

पेगासिस स्पायवेअरच्या मदतीने मोबाईल हॅक करून यंत्रणांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केला आहे. त्यामुळे केंद्राने किंवा कोणा सरकारी यंत्रणेने पेगासिस स्पायवेअरचा वापर करण्यासाठी परवानागी घेतली होती का?

याबाबतही सरकारने भुमिका मांडावी अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे. या मुद्दावरुन विरोधक सातत्याने विरोधक लोकसभा आणि राज्यसभेत देखील आवाज उठवत आहेत.

जागतिक माध्यम संस्थांनी केलेल्या चौकशी पत्रकार, वकील, मंत्री, विरोधी पक्षनेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांसह १४२ हून अधिक भारतीय नागरिकांची हेरगिरी करण्यात आल्याचेही म्हटले आहे.

याचिकेमध्ये म्हटले आहे की सिक्युरिटी लॅब ऑफ अ‍ॅम्नेस्टी इंटरनॅशनलच्या नेतृत्वाखाली हेरगिरीसाठी लक्ष्य करण्यात आलेल्या अनेक व्यक्तींच्या मोबाईलची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आली. या मोबाईलमध्ये पेगासिसच्या सहाय्याने हेरगिरी केल्याचे उघड झाले आहे.

लष्करी उपयोगासाठीच्या स्पायवेअरचा उपयोग करून हेरगिरी करणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. भारतीय घटनेच्या कलम १४ (कायद्याने समानता), कलम १९ (भाषण आणि अभिव्यक्ति स्वातंत्र्य) आणि कलम २१ (जगण्याचा अधिकार आणि वैयक्तिक स्वातंत्र्य) यांना सर्वोच्च न्यायालयाने मुलभूत अधिकार मानले आहेत.

सुप्रिम कोर्टात आज झालेल्या सुनावणीत याचिकाकर्त्यांच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी बाजू मांडली.

सर्वोच्च न्यायालयात पेगॅसस हेरगिरी घोटाळ्यावर सुनावणी झाली. सरन्यायाधीश एन व्ही रामण्णा आणि न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. त्याचवेळी, सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा म्हणाले की, जर अहवाल सत्य असेल तर आरोप गंभीर आहेत यात शंका नाही.

न्यायमुर्तींनी सांगितले की, २०१९ मध्ये हेरगिरीचे अहवाल आले होते, मला माहिती नाही की अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न झाला की नाही. या प्रकरणात वरिष्ठ पत्रकार एनराम आणि शशिकुमार, सीपीएमचे राज्यसभा खासदार जॉन ब्रिटस आणि वकील एमएल शर्मा यांनी याचिका दाखल केल्या आहेत. दरम्यान, या प्रकरणाची पुढील सुनावणी १० ऑगस्ट रोजी होणार आहे.

सुनावणी दरम्यान, एन.राम आणि इतरांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले, "ही स्पायवेअर केवळ सरकारी संस्थांना विकली जाते. खाजगी संस्थांना विकली जाऊ शकत नाही. एनएसओ तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सामील आहे. पेगॅसस हे एक धोकादायक तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनात नकळत प्रवेश करते. यामुळे आपल्या गोपनीयता, सन्मान आणि मूल्यांवर हल्ला झाला आहे."

"पत्रकार, सार्वजनिक व्यक्ती, घटनात्मक अधिकारी, न्यायालयीन अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ हे सर्व स्पायवेअरमुळे प्रभावित आहेत आणि सरकारला उत्तर द्यावे लागेल की ते कोणी विकत घेतले? हार्डवेअर कोठे ठेवले होते? सरकारने एफआयआर का नोंदवला नाही?", असा प्रश्न सिब्बल म्हणाले यांनी उपस्थित केला.

सुनावणी दरम्यान, एन.राम आणि इतरांच्या वतीने उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल म्हणाले, "ही स्पायवेअर केवळ सरकारी संस्थांना विकली जाते. खाजगी संस्थांना विकली जाऊ शकत नाही. एनएसओ तंत्रज्ञान आंतरराष्ट्रीय क्षेत्रात सामील आहे. पेगॅसस हे एक धोकादायक तंत्रज्ञान आहे जे आपल्या जीवनात नकळत प्रवेश करते. यामुळे आपल्या गोपनीयता, सन्मान आणि मूल्यांवर हल्ला झाला आहे."

"पत्रकार, सार्वजनिक व्यक्ती, घटनात्मक अधिकारी, न्यायालयीन अधिकारी, शिक्षणतज्ज्ञ हे सर्व स्पायवेअरमुळे प्रभावित आहेत आणि सरकारला उत्तर द्यावे लागेल की ते कोणी विकत घेतले? हार्डवेअर कोठे ठेवले होते? सरकारने एफआयआर का नोंदवला नाही?", असा प्रश्न सिब्बल म्हणाले यांनी उपस्थित केला.

पेगॅसस सॉफ्टवेअरच्या माध्यमातून भारतातील पत्रकार, नेते आणि प्रतिष्ठीत लोकांचे फोन हॅक केल्याचं वृत्त गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय मीडियात सुरु आहे. इस्रायलच्या एनएसओ ग्रुपच्या हॅकिंग सॉफ्टवेअर पेगॅससचा यासाठी वापर केल्याचं सांगितलं जात आहे.

जगभरातील अनेक देशांची सरकारे राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नसतानाही हेरगिरीच्या साधनांचा कसा वापर करू शकतात, हे 'द वायर' या वेबसाईटसह आणि अन्य १६ माध्यम संस्थांनी केलेल्या संयुक्त आंतरराष्ट्रीय शोधपत्रकारितेतून समोर आले आहे.

सुप्रिम कोर्टाचे निबंधक आणि न्यायामुर्तींवर देखील पाळत ठेवण्यात आल्याचं कपिल सिब्बल यांनी सुनावणी दरम्यान सांगितलं. आज झालेल्या सुनावणीत न्यायमुर्तीनी पेगासीस हेरगिरी प्रकरणासंबधीचे विविध प्रश्न उपस्थित केले. याबाबत आता सरकारी पक्षाला देखील सामावून घेतले जाणार आहे.

Updated : 5 Aug 2021 4:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top