Home > News Update > मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसुती आणि उपचार, रूग्णांच्या जीवाशी खेळ.

मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसुती आणि उपचार, रूग्णांच्या जीवाशी खेळ.

मेणबत्तीच्या प्रकाशात प्रसुती आणि उपचार, रूग्णांच्या जीवाशी खेळ.
X

पालघर : जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात डेंग्यु, चिकनगुण्या, मलेरिया, न्युमोनिया आणि टायफाईडचे रूग्ण आढळत आहेत. अनेक रूग्ण उपचारासाठी ग्रामीण रूग्णालयात दाखल होत आहेत. मात्र, रूग्णालयात वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे रूग्णांना आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो आहे.

आठवडाभरापासुन येथील वैद्यकीय अधिकारी वीजपुरवठा खंडित झाल्यावर मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलचा लाईट लावून रूग्णांवर उपचार करत आहेत. तर प्रसुतीगृहातही मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलचा लाईट लावून महिलांची प्रसुती प्रक्रिया पूर्ण करावी लागत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोखाडा तालुक्यातील 90 हजार नागरीकांचे आरोग्य अवलंबून असलेल्या ग्रामीण रूग्णालयाला गैरसुविधांनी घेरले आहे. तालुक्यात डेंग्यु, चिकनगुण्या, न्युमोनिया आणि मलेरियाचे रूग्ण आढळत आहेत. त्याचा सर्व भार ग्रामीण रूग्णालयावर येत आहे. रूग्णसंख्या वाढल्याने, खाटा भरल्या आहेत. रूग्णांना खाली गादी टाकून उपचार दिले जात आहे. येथे विजेचा कायम लपंडाव सुरू आहे. रूग्णालयात कन्व्हर्टर आणि जनरेटरची सुविधा असतांना, त्याचा वापर न करता, चक्क मेणबत्तीच्या प्रकाशात रूग्णांवर उपचार केले जात आहेत. तर प्रसुतीगृहातही मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलचा लाईट लावून महिलांची प्रसुती प्रक्रिया केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गर्भवती महिला आणि रुग्णांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा गंभीर प्रकार आठवडाभरापासुन सुरू आहे.

शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश निकम कुपोषित बालकांची पाहणी करण्यासाठी व आपल्या मुलीच्या उपचारासाठी रूग्णालयात गेले असता हा सारा प्रकार त्यांच्या समोर आला. मेणबत्तीच्या प्रकाशात आणि मोबाईलचा लाईट लावून रूग्णांना इंजेक्शन दिले जात होते. तर प्रसुतीगृहातही हाच गंभीर प्रकार दिसल्याने, निकम यांनी तातडीने वैद्यकीय अधिक्षक डाॅ महेश पाटील यांना दूरध्वनी करूनधारेवरर धरले. प्रत्येकवेळी आंदोलन केलेच पाहीजे का ? जाब विचारल्यावरच रूग्णांना सुविधा देणार का ? असे खडे बोल सुनावले. सरकार येथे सुविधा पुरवत असतांना त्याचा उपयोग का केला जात नाही असा सवालही त्यांनी विचारला. त्यानंतर अर्धा तासात रूग्णालयातील जनरेटर सुरू करण्यात आले.

या घटनेबाबत वैद्यकीय अधिक्षक डाॅ. महेश पाटील यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला असता सततच्या खंडित वीजपुरवठ्यामुळे कन्व्हर्टरच्या बॅटरी लो आहेत. तर जनरेटरचा फॅन नादुरुस्त असल्याने, रूग्णालयात अंधारात मेणबत्ती आणि मोबाईलचा लाईट लावून उपचार करावे लागत आहे. एका सामाजिक संस्थेने कन्व्हर्टर दिला आहे. तो लवकरच बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले patients treated in light of candles in mokhada hospital in palghar district

आहे.

Updated : 1 Sept 2021 12:51 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top