PM Narendra Modi : संसद अधिवेशन ऐतिहासिक निर्णयाचं - पंतप्रधान नरेंद्र मोदी
X
संसदेचं विशेष अधिवेशन आजपासून सुरूवात झाली आहे. संसदेत जाण्यापूर्वीच पंतप्रधान नरेंद मोदी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संसदेचं अधिवेशन का घेतलं जात आहे? यासंदर्भात सांगितले. तसेच संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी छोटा असला तरी या अधिवेशनात अनेक ऐतिहासिक निर्णय घेतला जाणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत असताना म्हणाले की "भारताच्या प्रयत्नामुळे आफ्रिकन संघ जी-20चा स्थायी सदस्य बनला. भारताला या गोष्टीचा नेहमीच अभिमान राहील. या सर्व गोष्टी भारताच्या उज्ज्वल भविष्याचे संकेत आहेत. कालच एक आंतरराष्ट्रीय संमेलन केंद्र यशोभूमीही देशाला समर्पित करण्यात आलं आहे, चंद्रावर तिरंगा फडकत आहे. तिथलं शिवशक्ती पॉईंट हा आपल्या प्रेरणेचं केंद्र आहे. जी-20 परिषदही यशस्वी पार पडली. अनेक संधी आणि शक्यता आपल्यासमोर निर्माण झाल्या आहेत. भारत ग्लोबल साऊथचा आवाज बनला आहे. देशात उत्साहाचा वातावरण आहे. संसदेच्या अधिवेशनाचा कालावधी भलेही छोटा असेल. पण काळाच्या हिशोबाने अधिक मोठा आहे. 75 वर्षाचा हा प्रवास आता नव्या मुक्कामातून सुरू होत आहे. हे ऐतिहासिक निर्णयाचं अधिवेशन असेल, असा विश्वास नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला.