संसदेत स्मोक बॉम्ब फोडण्याची वेळ तरुणांवर का आली ? पहा मॅक्स महाराष्ट्रचा विशेष रिपोर्ट
X
दिल्लीच्या संसद भवनात प्रवेश करत अमोल शिंदे याच्यासह एका तरुणाने स्मोक बॉम्ब फोडला आणि देशात एकच खळबळ माजली. संसदेच्या आवारात घडलेल्या या घटनेमध्ये या तरुणांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली..
माध्यमांनी हा संसदेवरील हल्ला आहे, स्मोक बॉम्ब फोडणारे तरुण दहशतवादी असल्यासारखेच वृतांकने केली. घटनेच्या खोलात न जाता माध्यमे या स्मोक बॉम्बच्या नळीमध्ये अडकली होती.
परंतु सदर कृत्य करताना या तरुणांनी ज्या घोषणा दिल्या त्यावरून त्यांना या कृत्यातून नक्की काय दर्शवायचे होते? या तरुणांचे कृत्य दहशतवादी कृत्य आहे का ? असा सवाल देखील या घटनेनंतर अधोरेखित झालाय. यासंदर्भात जेष्ठ नेते शामदादा गायकवाड यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
संसदेच्या अधिवेशनादरम्यान अनेक आंदोलने होत असतात. आपल्या मागण्यांची निवेदने घेऊन अनेक नागरिक येत असतात. या सगळ्यांना संबंधित मंत्र्याला सहजपणे भेटता येते का? सरकारच्या धोरणाविरोधातील त्यांची मते मांडण्याची संधी मिळते का ? याचा विचार करणे देखील महत्वाचे आहे..
संसद सभागृहात घडलेल्या घटनेमध्ये लातूर जिल्ह्यातील जरी या गावाचा २७ वर्षाचा अमोल शिंदे हा तरुण सहभागी होता. तो सर्वसामान्य कुटुंबातील असून पोलीस भरतीसाठी जातो म्हणून घरातून निघाला होता. त्याच्या आईवडिलांच्या पाठीमागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला असून आईवडील त्याच्या परतण्याची वाट पाहतायत...
या तरुणांनी सुरक्षा कवच भेदले कसे? त्यांचा उद्देश नक्की काय होता? याची सखोल चौकशी व्हायलाच पाहिजे. परंतु एक आंदोलन म्हणून त्यांनी जोखीम पत्करत काही मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी असे कृत्य केले असेल तर त्या मागण्याचा विचार व्हायला हवा. या तरुणांवर हे पाऊल उचलण्याची वेळ नक्की का आली? याचा विचार देखील व्हायला.