Home > News Update > भारत जगातील 'इंटरनेट शटडाउन' राजधानी : आनंद शर्मा

भारत जगातील 'इंटरनेट शटडाउन' राजधानी : आनंद शर्मा

भारत जगातील ‘इंटरनेट शटडाउन’ राजधानी कॉंग्रेसचा भाजपवर निशाणा, भाजप ने करून दिली राजीव गांधीच्या एका विधेयकाची आठवण... नक्की काय घडतंय संसदेत वाचा...

भारत जगातील इंटरनेट शटडाउन राजधानी : आनंद शर्मा
X

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचे पडसाद संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देखील पाहायला मिळत आहेत. तीन कृषी कायदे रद्द करण्यासाठी विरोधी पक्ष सरकारवर दबाव आणत आहेत. कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी शेतकरी आंदोलनावरून राज्यसभेत मोदी सरकारवर निशाणा साधताना त्यांनी भारताला "इंटरनेट शटडाऊन'' राजधानी असं संबोधलं आहे.

दिल्लीत सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान 26 जानेवारीला झालेल्या कथित हिंसाचारानंतर दिल्लीच्या काही भागात इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली आहे. यावर बोलताना आनंद शर्मा यांनी मोदी सरकारवर ही टीका केली. शेतकरी आंदोलनाचं मीडिया कव्हरेज करु नये म्हणून सरकारने नेट बंद केलं असल्याचा आरोप शर्मा यांनी लावला आहे.

यावर भाजप नेते राकेश सिन्हा यांनी आनंद शर्मा यांना उत्तर दिलं... कॉंग्रेसला लोकशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही. आणीबाणी चा काळ सर्वांना माहिती आहे. राजीव गांधी सरकारच्या काळात एक विधेयक पारीत करण्यात आलं होतं. त्यामध्ये सरकार कोणाचीही चिट्ठी उघडून वाचू शकत होती. त्यावेळचे राष्ट्रपती ज्ञानी जैल सिंह यांनी त्याला मंजूरी दिली नव्हती. मोदी सरकार मध्ये सगळ्यांचं ऐकलं जात आहे. शेतकऱ्यांशी बातचीत झाली आहे. मात्र, विरोधी पक्षांनी भडकावण्याचं राजकारण बंद केलं तर मार्ग सापडेल. असं म्हणत राकेश सिन्हा यांनी कॉंग्रेसच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

Updated : 6 Feb 2021 9:40 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top