Home > News Update > परमबीर सिंह सापडले, वकिलाच्या संपर्कात, पोलीस शोधणार का परमबीर सिंह यांचा पत्ता?

परमबीर सिंह सापडले, वकिलाच्या संपर्कात, पोलीस शोधणार का परमबीर सिंह यांचा पत्ता?

परमबीर सिंह सापडले, वकिलाच्या संपर्कात, पोलीस शोधणार का परमबीर सिंह यांचा पत्ता?
X

गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह हे आता सापडले आहेत, ते आपल्या वकिलाच्या संपर्कात असून त्यांनी सही केलेलं मुखत्यारपत्र वकिलाला पाठवले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता वकिलाच्या माध्यमातून पोलिस परमबीर सिंह यांचा पत्ता शोधणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत आता मोठे घुमजाव केले आहे. देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणाऱ्या चौकशी आयोगापुढे परमबीर सिंह यांनी आपले प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. आपल्याकडे अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांसंदर्भात सादर करण्यासाठी आणखी कोणतेही पुरावे नाहीत, असे त्यांनी आयोगाला कळवले आहे. आयोगापुढे नुकत्याच झालेल्या सुनावणीत परमबीर सिंग यांनी प्रतिज्ञापत्र सादर केले आहे.



अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना १०० कोटी वसुलीचे टार्गेट दिले होते तसेच पोलिसांच्या बदल्यांमध्ये भ्रष्टाचार केला होता, असा आरोप परमबिर सिंह यांनी केला होता. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांची चौकशी करण्यासाठी निवृत्त न्या. कैलाश उत्तमचंद चांदीवाल यांच्या एक सदस्यीय चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. चांदीवाल आयोगाने परमबीर सिंग यांच्याविरुद्ध अनेक समन्स आणि जामीनपात्र वॉरंट जारी केले पण तरीही ते हजर झालेले नाहीत. याप्रकरणात आयोगाने परमबीर सिंग यांना तीनवेळा दंड ठोठावला आहे.

पण अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर आता परमसिंह यांनी ही माहिती दिल्याचे समोर आले आहे. आता परमबिर सिंह सध्या कुठे आहेत, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान आम्ही आधीपासूनच हे सर्व आरोप खोटे आहेत, असे सांगत होतो, ते आता सिद्ध झाले आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

Updated : 3 Nov 2021 8:28 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top