परमबीर सिंह यांना 25 हजारांचा दंड
X
खंडणी प्रकरणी अडचणीत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना आणखी एक दणका बसला आहे. परमबीर सिंह यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. माजी गृहमंत्री अऩिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केकेल्या आरोपां प्रकरणी समिती स्थापन करण्यात आली आहे. या एक सदस्यीय समितीने परमबीर सिंह यांना हा दंड ठोठावला आहे. मुंबई हायकोर्टाचे माजी न्यायाधीश के.यू चांदिवाल हे या समितीचे प्रमुख आहेत. परमबीर सिंह समितीपुढे वारंवार अनुपस्थित राहत असल्याने चांदिवाल यांनी हा दंड ठोठावला आहे.
परबमीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशममुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने ह्या समितीची स्थापना केली होती. समितीचे वकील शिशिर हिरे यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत परमबीर सिंह यांना समितीने 5 वेळा बोलावले, पण ते गैरहजर राहिले. 18 ऑगस्ट रोजी देखील त्यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. पण ते गैरहजर राहिल्याने समितीने त्यांना 25 हजार रुपये दंड ठोठावला आहे. तसेच या 3 दिवसांच्या आत दंडाची रक्कम मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
दरम्यान परमबीर सिंह यांनी समिती स्थापन करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला हायकोर्टात आव्हान दिले आहे. त्यावरील सुनावणी 23 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता आहे. समितीसमोर काय जबाब द्यायचा याबाबत सुनावणीमध्ये हायकोर्ट काय सूचना देते त्याची वाट सध्या सिंह पाहत आहेत, अशी माहिती परमबीर सिंह यांच्या वकिलांनी दिली आहे.