Home > News Update > पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला संकल्प जाहीर करण्याचा मनोदय

पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला संकल्प जाहीर करण्याचा मनोदय

पंकजा मुंडे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; 12 डिसेंबरला संकल्प जाहीर करण्याचा मनोदय
X

मुंबई // भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी भाजप नेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर एक संकल्प करण्याचा मनोदय जाहीर केला. यासाठी त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून एक भावनिक पत्र लिहिले आहे. गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही असे पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे. तसेच 12 डिसेंबरला आपण एक संकल्प करणार आहोत, तो संकल्प तुम्ही पूर्ण करणार का? असा सवाल देखील पंकजा यांनी आपल्या कार्यकर्त्यांना केला आहे. त्यांनी आपले हे पत्र ट्विट देखील केले आहे.

दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांची 12 डिसेंबरला जयंती आहे. या पार्श्वभूमीवर माजीमंत्री तथा भाजपच्या सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना एक पत्र लिहीले . 12 डिसेंबर, 3 जून आणि दसरा हे दिवस आपण विसरू शकत नाही. या तिन्ही दिवशी कोणत्याही निमंत्रणाशिवाय तुम्ही गडावर येत असता, आमच्यावर अलोट प्रेम करता हे विसरता येणार नाही. गोपीनाथ गडावर आतापर्यंत अनेक जण येवून गेले, अनेक दुःखी कुटुंबांना गोपीनाथ गडावरून मदत करता आली त्या सर्वांचे आशीर्वाद मिळाले, हे आशीर्वाद चुकीच्या गोष्टी सुधारण्यासाठी असतील, हे आशीर्वाद धगधगती मशाल तेजस्वी ठेवण्यासाठी असतील असे पंकजा यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच 12 डिसेंबरला एक संकल्प करण्याचा मनोदय पंकजा मुंडे त्यांनी व्यक्त केला. हा संकल्प पूर्ण करणार का असा सवाल त्यांनी या पत्रातून आपल्या कार्यकर्त्यांना विचारला आहे. मात्र हा संकल्प नेमका काय असणार हे या पत्रात स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पंकजा मुंडे यांच्या या नव्या संकल्पाबाबत कार्यकर्त्यांसह सर्वांनाच उत्सुकता आहे.

Updated : 9 Dec 2021 7:22 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top