"डॉक्टर प्रीतम तुम्ही सुध्दा???"
X
राज्यात कोरोनाचे दिवसेंदिवस रुग्ण वाढत आहेत.अशा परिस्थितीत आरोग्य यंत्रणेवर ताण वाढला आहे. अनेक लोकप्रतिनिधी लोकांना घराबाहेर पडू नका असं सांगत आहेत. तर काही लोकप्रतिनिधी घराच्या बाहेरही पडत नाहीत आणि मतदारसंघातील जनतेशी बातचीतही करत नाही. मात्र, बीड लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. प्रितम मुंडे यांनी थेट हॉस्पिटलमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
या संदर्भात त्यांनी ट्वीट केलं असून त्या ट्वीटमध्ये त्यांनी ही माहिती दिली आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे,आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच रुग्णांशी संवाद साधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट आणि स्वयंपाक गृहाची पाहणी केली. अशी माहिती डॉ. प्रितम मुंडे यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे.
कोरोनाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्यामुळे आरोग्य यंत्रणेवरील भार वाढला आहे,आज जिल्हा रुग्णालयाला भेट देऊन आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेतला.तसेच रुग्णांशी संवाद साधून लिक्विड ऑक्सिजन प्लांट आणि स्वयंपाक गृहाची पाहणी केली. pic.twitter.com/8p1s8607W6
— Dr. Pritam Munde (@DrPritamMunde) April 14, 2021
प्रितम मुंडे यांनी हॉस्पिटलला भेट दिल्यानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी ट्वीटर
"डॉक्टर प्रीतम तुम्ही सुध्दा???" ... "काळजी घ्या" असं म्हणत ट्वीट केलं आहे .
"डॉक्टर प्रीतम तुम्ही सुध्दा???" ... "काळजी घ्या" 🤗#covidwarrior@DrPritamMunde pic.twitter.com/K1BeMbLxWd
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 14, 2021
पंकजा मुंडे यांच्या ट्वीटवर नेटिझन्सनी चांगल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
संगम बांगर यांनी पंकजा मुंडेंच्या ट्वीटला रिप्लाय दिला असून वारसा लोकनेत्याचा वसा जनसेवेचा!! गर्व आहे आम्हाला खासदार ताईसाहेबांचा असं म्हटलं आहे.
वारसा लोकनेत्याचा वसा जनसेवेचा!!
— Sangram Bangar (@Sangrambangar2) April 14, 2021
गर्व आहे आम्हाला खासदार ताईसाहेबांचा