Home > News Update > पंकजा मुंडे राज्यसभेवर -देवेंद्र फडणवीस यांची शिफारस

पंकजा मुंडे राज्यसभेवर -देवेंद्र फडणवीस यांची शिफारस

पंकजा मुंडे राज्यसभेवर -देवेंद्र फडणवीस यांची शिफारस
X

पुणे - बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार असणाऱ्या पंकजा मुंडे यांचा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला आहे. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा गड मानला जाणारा बीड लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे बजरंग सोनावणे यांनी लोकसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 मध्ये बीडमधून विजय मिळवला. व गेली अनेक वर्ष बीड मध्ये मुंडे कुटुंबीयांचं असणार वर्चस्व मोडीत काढलं. स्थानिक पातळीवरील राजकीय घडामोडी पाहता पंकजा मुंडे यांचं पुन्हा राजकीय पुनर्वसन होणं गरजेचं आहे. अशी भावना राजकीय वर्तुळात आहे.

पंकजा मुंडे यांच्या पराभवानंतर देखील, त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी देवेंद्र फडणवीस यांनी आता पुढाकार घेतला असून, राज्यसभेवर खासदार म्हणून पंकजा मुंडे यांची निवड करण्यात यावी अशी शिफारस फडणवीस वरिष्ठांन कडे केले आहे. पंकजा मुंडे यांचा पराभव हा जातीय राजकारणामुळे झाला असल्याची मोठी चर्चा ही बीड परिसरात पाहायला मिळते आहे. मुंडे कुटुंबाला मोठी सामाजिक व राजकीय पार्श्वभूमी आहे. भाजपमध्ये मुंडेंचं स्थान महत्त्वाचं असून महाराष्ट्रा सह देशाच्या राजकारणामध्ये मुंडे कुटुंबियांचे स्थान महत्त्वपूर्ण असल्याने पंकजा मुंडे यांचे पुन्हा राजकीय पुनर्वसन व्हावे अशी इच्छा मोठ्या प्रमाणात भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे.

दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे हे आजही ओबीसींचे नेते म्हणून ओळखले जातात. भारतीय जनता पक्षासोबत ओबीसींची ताकद जोडण्यांमध्ये मुंडे कुटुंबाचा मोठा सहभाग आहे. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पंकजा मुंडे यांचा पराभव हा जातीय हेतूने झाल्याने, राजकारणाच्या जातीय समीकरणांमध्ये मोठे फेर बदल झाले आहेत. मुंडे कुटुंबीय हे पहिल्यापासून ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आहे. ओबीसींचा आवाज संसदेत असावा ही भावना सर्वसामान्य ओबीसींची असल्याची एक मोठी चर्चा समोर येत असताना. पंकजा मुंडे यांचे राजकीय पुनर्वसन व्हावं अशी चर्चा पक्षांतर्गत देखिल चालू आहे. या सर्व घडामोडींचा विचार करता पंकजा मुंडे यांचा लोकसभेत पराभव झालेला असताना देखील मराठवाड्याच्या राजकीय दृष्टिकोनाच्या आधारे पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन महत्वपूर्ण असल्याने त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून संधी मिळणार असल्याची चर्चा समोर येत आहे. राज्यसभेवर खासदार म्हणून पंकजा मुंडे यांची नियुक्ती व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरिष्ठांकडे शिफारस केली आहे.

Updated : 21 Jun 2024 3:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top