Home > News Update > Pankaja Munde Corona Positive मोठा भाऊ म्हणून मी सोबत: धनंजय मुंडे

Pankaja Munde Corona Positive मोठा भाऊ म्हणून मी सोबत: धनंजय मुंडे

Pankaja Munde Corona Positive  मोठा भाऊ म्हणून मी सोबत: धनंजय मुंडे
X

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना कोरोनाची लागण झाली आहे. या संदर्भात त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर गेले काही दिवस त्या क्वारंटाईन आहेत. मात्र, त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट आता पॉझिटीव्ह आला आहे. या संदर्भात त्यांनी ट्विटर ट्वीट करत माहिती दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहे. असं ट्वीट केलं आहे. दरम्यान आज सकाळी पंकजा यांनी त्यांना कोरोना झाल्याची माहिती ट्वीट करुन दिली...

"माझी करोना चाचणी पॉझिटिव्ह आली. मी आधीच काळजी घेत असून विलगीकरणात आहे. मी अनेक लोकांना तसंच करोना रुग्णांच्या कुटुंबीयांची भेट घेतली असून त्याद्वारे संसर्ग झाला असावा. माझ्यासोबत जे होते त्यांनीदेखील चाचणी करुन घ्या..काळजी घ्या". त्यानंतर धनंजय मुंडे यांनी आता ट्वीट करत काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

ताई, या विषाणूचा सामना मी दोनवेळा केलाय, यामुळे होणाऱ्या त्रासाची मला जाणीव आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याने तातडीने योग्य उपचार घ्या. घरच्या सर्वांची टेस्ट करून घ्या, मोठा भाऊ म्हणून मी सोबत आहेच. प्रभू वैद्यनाथाच्या आशीर्वादाने आपण लवकरच बऱ्या व्हाल, काळजी घ्या पंकजा ताई

Updated : 29 April 2021 12:01 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top