ग्रामपंचायत निवडणूक: आम आदमी पार्टीने गडचिरोलीत खाते उघडले
X
महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल २२ जानेवारी, २०२१ ला जाहीर करण्यात आले आहेत. या निवडणुकीमध्ये आम आदमी पार्टीला विजय मिळाला असून २९ उमेदवार विजयी झाले आहेत! आम आदमी पक्षाचे महाराष्ट्रातील एकूण विजयी उमेदवारांची संख्या 145 आहे. यामध्ये लातूर मध्ये एक आणि गडचिरोली मध्ये दोन गावात संपूर्ण पॅनेल विजयी झालं आहे. हा विजय फक्त ३०० उमेदवार निवडणुकीत उभे करून मिळवला असून पक्षाचा स्ट्राइक रेट ४८.३३% इतका आहे. .
पक्षाचे जिल्हानिहाय निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य खालीलप्रमाणे आहेत.
हिंगोली ११
लातूर ५
जालना ४
सोलापूर ११
गडचिरोली २९
नागपूर ६
वाशिम १
यवतमाळ ४१
बुलढाणा १८
चंद्रपूर १०
भंडारा ३
पालघर २
नाशिक १
अहमदनगर ३
एकूण - १४५
पॅनेल:
गाव दापक्याळ, तालुका चाकूर, जिल्हा लातूर.
गाव बेटेक, तालुका कोर्ची, जिल्हा गडचिरोली
गाव मारोरा, तालुका चामोर्शी, जिल्हा गडचिरोली
या निकालानंतर आप नेत्या प्रिती शर्मा मेनन यांनी माध्यमांशी संवाद साधताना...
"या वर्षी जिल्हा परिषद आणि महानगरपालिका निवडणुका लढवून पक्ष पुढचं पाऊल टाकण्याच्या तयारीत आहे आणि आम आदमी पार्टी महाराष्ट्रात वाढत जाणारा एक पक्ष असल्याने आम्ही जनतेला आमच्या पक्षात सामील होण्यासाठी आमंत्रित करत आहोत."