Home > News Update > पुण्यात रस्त्याला पंडित भास्कर चंदावरकर यांचे नाव

पुण्यात रस्त्याला पंडित भास्कर चंदावरकर यांचे नाव

पुण्यात रस्त्याला पंडित भास्कर चंदावरकर यांचे नाव
X

पुणे: कोथरूडमधील प्रभाग 13 मधील एका रस्त्याला संगीतकार पंडित भास्कर चंदावरकर यांचे नाव देण्यात आलं आहे. या संदर्भात आज (रविवारी) सकाळीच या नामकरण फलकाचे अनावरण कोथरूडचे आमदार आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शास्त्रीय गायक आनंद भाटे देखील उपस्थित होते.

संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निवासस्थान या भागात असून 1983 पासून अखेरपर्यंत म्हणजे 2009 पर्यंत ते या ठिकाणी राहिले. पं. चंदावरकर यांनी भारतीय शास्त्रीय संगीत आणि पाश्चात्य संगीताचा प्रदीर्घ अभ्यास केला.

त्यांनी 14 वर्षे पुण्यात फिल्म इन्स्टिटयूटममध्ये तसेच परदेशी विद्यापीठामध्ये संगीत अध्यापन केले. त्यांनी 34 चित्रपटांना संगीत दिले आणि देशी परदेशी सतार वादनाचे कार्यक्रम केले. जुलै 2009 मध्ये त्यांचे निधन झाले.

Updated : 21 Jun 2021 9:48 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top