पालघर जिल्हा परिषदेचे कोट्यवधींचा निधी वापराविना परत गेल्याचा आरोप
पालघर जिल्हा परिषदेला मिळणाऱ्या विकास निधीपैकी तब्बल २०३ कोटी रुपयांचा निधी वापराविना परत गेल्याचा गंभीर प्रकार घडला आहे. यासंदर्भात जिल्हा परिषदेते उपाध्यक्ष निलेश सांबेर यांनीच मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.
X
पालघर : जिल्ह्याचे शेवटचे टोक असलेला मोखाडा तालुका हा अनेक समस्यांनी ग्रासलेला आहे. त्यामुळे इथल्या समस्या सोडवायच्या असतील जिल्ह्यात भरती करताना स्थानिकांना प्राधान्य दिले गेले पाहिजे अशी मागणी पालघर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष निलेश सांबरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली आहे.
या जिल्ह्यातील अनेक समस्या स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतरही सुटलेल्या नाहीत. यामुळे येथील कुपोषण, रोजगार, आरोग्य, स्थलांतर, पाणी टंचाई वाढती बेरोजगारी शिक्षण या सर्व समस्या सोडवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालण्याची मागणी त्यांनी केली आहे. तसेच मोखाड्यातील विविध विभागात कार्यरत असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्या कामकाजावर नाराजी व्यक्त करत त्यांनी ढील काळात जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत स्थानिका प्राधान्य द्या अशी मागणी केली आहे. सांबरे यांनी नुकताच मोखडा इथे पाहणी दौरा केला. पण प्राथमिक आरोग्य केंद्र, तहसील कार्यालय, पंचायत समिती येथे भेट दिली असता इथे त्यांना एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे त्यांना आढळून आले. तसेच आदिवासींच्या विकासासाठी राबवणाल्या जाणाऱ्या योजना कुणाच्या घश्यात जात आहे याचीही चौकशी कऱण्याची मागणी त्यांनी या पत्रात केली आहे.
जिल्ह्यातील शिक्षक आणि अन्य विभागांच्या ३० टक्के जागा रिकाम्या आहेत. ज्यांची भरती होते ते नंतर लगेच बदली करुन घेतात. त्यामुळे जिल्ह्यातील भरती प्रक्रियेत स्थानिकांना प्राधान्य द्यावे अशी भूमिका त्यांनी मांडसी आहे. जिल्ह्यातील २०३ कोटी रुपयांचा विकासनिधी परत गेला आहे. तसेच या उदासीन कारभारामुळे दरवर्षीच हजार कोटींपेक्षा अधिक निधी परत गेला असल्याचे नाकारता येत नाही, असेही त्यांनी या पत्रात म्हटले आहे.