पद्म पुरस्कारांची घोषणा :सीडीएस जनरल बिपिन रावत मरणोत्तर पद्म विभूषण
सालाबादप्रमाणे प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षासाठीपद्म पुरस्कार जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींना पद्म पुरस्कार घोषीत झाले असून काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान करण्यात आला आहे.
X
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षासाठीपद्म पुरस्कार जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्रातून सायरस पूनावाला, बालाजी तांबे, प्रभा अत्रे, राधेश्याम खेमका, बिपिन रावत, कल्याण सिंग, सोनू निगम, सुलोचना चव्हाण, डॉ. हिम्मतरावर बावस्कर आदींना पद्म पुरस्कार घोषीत झाले असून काँग्रेस नेते गुलाम नबी आझादांचाही सन्मान करण्यात आला आहे.
उद्या ७३ वा गणतंत्र दिवस 26 जानेवारी अर्थात प्रजासत्ताक दिन देशभर उत्साहात साजरा होत आहे. आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. एकूण 128 जणांना पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. त्यात सीडीएस बिपीन रावत यांना मरणोत्तरत पद्म विभूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्यनारायण नाडेला, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, सीरम इन्स्टिट्युटचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पूनावाला, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांना पद्मभूषण तर ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा, प्रमोद भगत, वंदना कटारिया,त्याचबरोबर कला क्षेत्रात प्रभा अत्रे यांना पद्म विभूषण, गायक सोनू निगमला पद्मश्री, आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.
पद्मभूषण पुरस्कार –
सायरस पुनावाला (व्यापर आणि उद्योग) , नटराजन चंद्रशेखरन (व्यापर आणि उद्योग), सत्या नाडेला, सुंदर पिचई, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद
पद्मश्री पुरस्कार –
बालाजी तांबे, विजयकुमार डोंगरे, सुलोचना चव्हाण, नीरज चोप्रा, डॉ. हिंमतराव बावसकर, सोनू निगम, अनिल राजवंशी, भिमसेन सिंगल, वंदना कटारिया