आमचा गनिमी कावा फसला – देवेंद्र फडणवीस
X
अजित पवार यांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करण्याचा निर्णय बरोबर होता की चूक हे काळच ठरवेल, कदाचित हे चूकच ठरेल मात्र एक मात्र खरं की आमचा गनिमी कावा फसला अशी कबूली माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी झी 24 तास या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगीतलं.
अजित पवार यांनी आपल्याला आमदारांचं समर्थन असल्याचं पत्र दिलं होतं. त्याच प्रमाणे आमदारांशी संपर्क ही करून दिला होता. नेमकं काय झालं हे माहित फक्त अजित पवारच सांगू शकतील, मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर त्यांनी मला भेटून हे मला आता जमणार नाही असं सांगीतलं आणि मी लगेच राजीनामा दिला. मी त्यांना फार काही विचारलं नाही असं ही देवेंद्र फडणवीस यांनी सांगीतलं आहे.
हे ही वाचा
गिरिश महाजन यांचं आव्हान स्वीकारलं – एकनाथ खडसे
हैदराबाद एन्काउंटरच्या घटनेनं उन्नाव पीडितेची हेडलाईन मॅनेज केली काय?
भाजप नेत्यांकडून ओबीसी नेत्यांची मनधरणी सुरु…
मला गमावण्यासारखं काही नाही, जे काही आहे ते कमवण्यासाठीच आहे. त्यामुळे मला गर्व यावा असं काहीच नव्हतं. मी पुन्हा येईन ही विधानसभेतील साधीशी कविता. यात गर्व नव्हता. तर मी लोकांची सेवा करण्यासाठी परत येईन असा त्यात अर्थ होता. ही लोकांनी व्हायरल केलेली कविता. गर्व वगैरे असा विषयच नाही. पवार साहेबांचं सोडा पण अनेक लोकं बोलतात की आम्ही हरलो. मला माझ्या मर्यादा क्षमता माहितीयत. मी कधीच माझ्या नावाने मतं मागितली नाहीत. मोदींचं नाव आणि काम सांगून आम्ही मतं मागितलं. आम्ही हरलेलो नाही. आम्ही जिंकलोंयत. 70 टक्के जागा जिंकून. 105 जागा जिंकून आम्ही जिंकलोय. लोकांनी ज्यांना नाकारलंय त्यांनी एकत्र येऊन आकड्याचा खेळ केलाय असं ही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय.