मंत्रालयातून आदेश ; ३० दिवसांसाठी लोकशाही बंद
X
आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद करून चॅनेल बंद करण्यात यावे असे आदेश मंत्रालयाकडून देण्यात आले आहेत. याबरोबरच मंत्रालयाकडून चॅनेलचे लायन्सस देखील 30 दिवसांसाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहीती समोर आली आहे.
३० दिवसांसाठी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद
14 जुलै 2023 रोजी दाखवण्यात आलेल्या भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावरील अटमी चा एक विडियो लोकशाही या वृत्तवाहिनीने दाखवल्याने 72 तास हे चॅनेल बंद करण्याची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर दिल्ली हायकोर्टात याविरोधात लोकशाही मराठी वृत्तवाहिनीच्यावतीने अपील करण्यात आली होती. त्यानंतर बंदी आदेश रद्द करण्यात आला होता. परंतु पुन्हा एकदा लोकशाही मराठी चॅनेलचे लायन्सस रद्द करण्याचा निर्णय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून घेण्यात आला आहे.
चार महिन्यांपूर्वी प्रसारण खात्याने लोकशाही मराठी वृत्तवाहिनीकडून काही माहिती मागवली नव्हती. परंतु ती अचानकपणे वेगवेगळी कारणे देत माहिती मागविण्यात आली. यामध्ये लायन्ससबाबत प्रश्न उपस्थित करत लोकशाही मराठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. येत्या 26 जानेवारी रोजी लोकशाही मराठी चौथा वर्धापन दिन साजरा करणार होती. पण, गेले काही दिवस वारंवार माहिती आणि प्रसारण मंत्रालय खात्याकडून या वृत्तवाहिनीस नोटीस देण्यात येत होत्या. आणि आज थेट मंत्रालयातून कारवाईचे पाऊल उचलेले आहेत. मंत्रालयाकडून ३० दिवसांसाठी लोकशाही मराठी वृत्तवाहिनीचे प्रसारण बंद करून ३० दिवसांसाठी लोकशाहीचा परवाना देखील बंद करण्यात आला असल्याची माहीती स्वत:हा लोकशाहीचे संपादक कमलेश सुतार यांनी आपल्या एक्स पोस्ट द्वारे दिली आहे. या आदेशानंतर मंत्रालयाच्या या कृत्याचा समाज माध्यमातून तीव्र निषेध नोंदवला जात आहे.
Important Update
— Kamlesh Sutar (@kamleshsutar) January 9, 2024
License of Lokshahi Marathi has been suspended by Ministry of Information and Broadcasting for 30 Days. https://t.co/IG1Ogj5NUy