Home > News Update > जरांगे पाटील राजधानीत येताच सर्वेक्षणाचे आदेश देणे, हा सरकारचा निव्वळ निष्क्रीयपणा; जयंत पाटील

जरांगे पाटील राजधानीत येताच सर्वेक्षणाचे आदेश देणे, हा सरकारचा निव्वळ निष्क्रीयपणा; जयंत पाटील

जरांगे पाटील राजधानीत येताच सर्वेक्षणाचे आदेश देणे,  हा सरकारचा निव्वळ निष्क्रीयपणा; जयंत पाटील
X


राज्यात सध्या मराठा आरक्षणाच्या विषयाने जोर धरला आहे. मराठा आंदोलनाचं नेतृत्व करणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे रवाना झाले आहेत. ते मुंबईत 26 जानेवारी पासुन आमरण उपोषण करणार आहेत. आता मनोज जरांगे सरकारच्या दारी येताच सामाजिक सर्वेक्षणाचे आदेश देणे म्हणजे सरकारचा निव्वळ निष्क्रीयपणाच आहे असा हल्लाबोल मंगळवारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सांगलीत केला. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.


याअगोदरच मराठा समाजाच्या सर्वेक्षणाचे आदेश सरकारने द्यायला पाहिजे होते. जरांगे पाटलांनी वेळोवेळी या सरकारला उदार अंत:करणाने वाढीव वेळ आणि मुदत दिली होती. पण सरकारने याकडे प्राधान्याने बघितले नाही. आता मात्र आंदोलक मुंबईच्या दिशेने येताच सरकारने घाईगडबडीने सर्वेक्षणाचे आदेश दिले आहेत. इतके दिवस सरकारकडे इतर गोष्टींसाठी वेळ होता मात्र मराठा समाजाचा मुद्दा प्राधान्याने हाताळला नाही यातून सरकारचा निष्क्रीयपणा दिसुन येतोय. आताही लोकसभा, विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नुसताच आरक्षणाचा निर्णय देऊ नये, तर सरकारने समाजाला कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण द्यायला हवे, अन्यथा समाजावर फार मोठा अन्याय होण्याची संभावना आहे असंही जयंत पाटील म्हणाले.

Updated : 23 Jan 2024 8:34 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top