आजीला दिला धीर...नातवंडांना न्याय मिळवून देण्याचा दिला शब्द... : प्रविण दरेकर
वीजेचा शॉक लागून ज्ञानेश्वर अप्पासाहेब जाधव, रामेश्वर अप्पासाहेब जाधव आणि सुनिल अप्पासाहेब जाधव या तीन भावांचा एकाच वेळी मृत्यू झाल्याची घटना भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे या गावात घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. ऐन दिवाळीत जालन्यामध्ये काळजाचा ठोका चुकवणारा हा प्रकार घडला आहे. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज जाधव कुटुंबियांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले.
X
आपल्या नातवांना अनपेक्षितपणे गमाविलेल्या आजीवर दु खाच्या डोंगर कोसळला आहे. त्या दुदैर्वी आजीने आपल्या नातवांना न्याय मिळवून द्या अशी आर्त विनवणी विरोधी पक्ष नेते दरेकर यांच्याकडे केली. त्यांनी आजीला धीर दिला. डोंगराएवढे दुख कोसळल्यामुळे जाधव कुटुंबिय संपुर्णपणे खचले आहे. पण जाधव कुटुंबवियांना न्याय मिळवून देण्याचा शब्द दरेकर यांनी दिला. सरकारने आम्हाला प्रत्येकी २० लाखाची नुकसानभरपाई द्यावी तसेच या घटनेला जबाबदार असणाऱ्या एमएसईबीच्या अधिकाऱ्याला तातडीने बडतर्फ करण्याची मागणी जाधव कुटुंबियांनी दरेकर यांच्याकडे केली.
त्यानंतर दरेकर यांनी ऑन द स्पॉट जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक आणि राज्याचे उर्जा सचिव असिम गुप्ता यांना फोन लावला. पळसखेडा प्रकरणात अद्यापही जबाबदार व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल न झाल्याबददल दरेकर यांनी जिल्ह्याच्या एसपीला जाब विचारला व यांसदर्भात तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. तसेच येथील वीजेच्या समस्येबद्दल उर्जा सचिवाशी चर्चा केली. तसेच महावितरणच्या ज्या अधिका-यांच्या निष्काळजीपणामुळे तीन निष्पापांना आपला जीव गमवावा लागला,त्या अधिका-यांना तातडीने निलंबित करण्याची मागणी दरेकर यांनी केली. उर्जा सचिवांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आश्वासन त्यांना दिले.
या भागात दिवसा वीज उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित कायद्यात दुरुस्ती करावी लागणार असून त्यादृष्टीने आगामी अधिवेशनात या विषयावर पाठपुरावा करुन हा विषय तडीस लावण्याचे दरेकर यांनी स्पष्ट केले. तसेच जाधव कुटुंबियांच्या घरातील कर्तेपुरुष गेल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे त्यांना सरकारच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यात येईल. पण भाजपाच्या माध्यमातून तातडीची मदत देण्याचे आश्वासनही दरेकर यांनी यावेळी दिले.