कॉंग्रेससह देशातील 12 पक्षांचं मोदींना पत्र, 'या' आहेत पत्रातील महत्त्वाच्या मागण्या
X
पत्रावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सह देशातील 4 राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सह्या, पत्रात मोदी सरकारवर गंभीर आरोप, मोदींचा ड्रीम प्रोजक्ट थांबवण्याची विरोधकांची मागणी... मोदी विरोधकांच्या या पत्राची दखल घेणार का?काय आहे पत्र वाचा
देशातील दुसऱ्या कोरोना लाटेत देशाची आरोग्य व्यवस्था कोलमडून (Corona Second Wave) गेली आहे. दररोज देशातील हजारो लोकांचा मृत्यू होत आहे. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष मोदी सरकारवर जोरदार टीका करताना पाहायला मिळत आहे. त्यातच आता देशातील विरोधी पक्षांनी मोदींना एक पत्र लिहिलं असून या पत्रावर कॉंग्रेससह 12 प्रमुख विरोधी पक्षांच्या सह्या आहेत.
या पत्रात विरोधी पक्षाने सुचवलेल्या मुद्द्याकडे केलेले दुर्लक्ष आणि सरकारच्या बेजबाबदार धोरणांवर टीका करण्यात आली आहे. तसेच या पत्रात लसींचं उत्पन्न वाढवण्याची मागणी देखील केली आहे. त्यासाठी 35 हजार कोटींचा निधी खर्च करण्यात यावा असं सुचवलं आहे.
पत्रातील महत्त्वाचे मुद्दे
मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेला सेंट्रल विस्टा प्रोजेक्ट ला तात्काळ थांबवण्यात यावे. 'Scrap Central Vista project' या प्रोजेक्ट चा पैसा ऑक्सिजन आणि लसीकरणासाठी खर्च करण्यात यावा.
पीएम केअरचा पैसा मेडिकल उपकरण, ऑक्सिजन, औषधं खरेदी करण्यासाठी वापरण्यात यावा
बेरोजगारीचा फटका बसलेल्या बेरोजगारांना 6 हजार प्रतिमहिना देण्यात यावे
देशाच्या अन्न धान्यांच्या गोदामातील अन्न देशातील गरजुंना मोफत देण्यात यावं.
कृषी कायदे रद्द करुन शेतकऱ्यांना या महामारीपासून वाचवावं
अशा मागण्या विरोधी पक्षाने केल्या आहेत..
या पत्रात कोणाच्या आहे स्वाक्षऱ्या?
पत्रावर 4 मुख्यमंत्र्यांच्या सह्या...
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Chief Ministers Mamata Banerjee), तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलीन (M K Stalin), महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) , झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन (Hemant Soren) या चार मुख्यमंत्र्यांच्या सह्या असून कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी ( Congress president Sonia Gandhi), देवेगौडा (H D Deve Gowda), राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख शरद पवार, (NCP patriarch Sharad Pawar), समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Samajwadi Party leader Akhilesh Yadav), नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ. फारुख अब्दुल्ला( National Conference leader Dr. Farooq Abdullah), राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव( RJD leader Tejashwi Yadav), डी राजा ( CPI general secretary D Raja) सीताराम येचुरी ( CPI(M) general secretary Sitaram Yechury )
यांच्या सह्या आहेत.