काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही : चंद्रकांत पाटिल
X
दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून राज्यात आंदोलन करणाऱ्यांना खडेबोल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सुनावले आहेत. काहीही झालं तरी कृषी कायदा रद्द होणार नाही, त्यात फक्त बदल केला जाईल. सरकारने सर्वसामान्य शेतकऱ्यांना डोळ्यासमोर ठेऊन कायदा तयार केला आहे, असा दावा चंद्रकांत पाटलांनी केला आहे.
भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेक्ष अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या वतीने पुणे स्टेशनजवळच्या आंबेडकर पुतळ्याजवळ करण्यात आले. यावेळी बोलताना
शरद पवारांनी केलेल्या वक्तव्याला उत्तर देताना दादांनी कायदा रद्द होणार नसल्याचं ठणकावून सांगितलंय, केंद्र सरकारने केलेल्या कायद्यात नवीन काही बदल केला नाही, जे जुन्या कायद्यात होतं,तेचं आहे.
फक्त आता या कायद्याने शेतकऱ्यांना मार्केटच्या बाहेर माल विकण्याची परवानगी मिळाली जी आधी नव्हती, प्रश्न फक्त एमएसपीचा होता ,केंद्र सरकार ऑन पेपर एमएसपीची रक्कम लिहून द्यायला तयार आहे, तरीही आम्ही आंदोलन करणार , भारत बंद करणार याला काही अर्थ नाही, केंद्र सरकारने केलेला कायदा रद्द होणार नाही ,फक्त कायद्यात बदल केला जाईल.
पदवीधर निवडणुकीत प्रचाराच्या निमित्ताने दादांनी निवडणूक हरलो तर हिमालयात जाईल असं वक्तव्य केलेलं होतं, मात्र हा प्रश्न विचारला असता दादांनी यावरती बोलायला नकार दिला. देशात केलेल्या कृषी कायद्यावरून विरोधी पक्षातील नेते राष्ट्रपतींची भेट घेणार आहेत, यावरती चंद्रकांत पाटलांनी बोलताना भेटीसाठी शुभेच्छा दिल्यात, लोकशाही आहे, लोकशाहीत कोणीही भेट घेऊ शकतं, भेट घेत असतील तर त्यांच स्वागत आहे. अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटिल यांनी दिली.