Home > News Update > #Budgetsession - विरोधकांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार....

#Budgetsession - विरोधकांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार....

#Budgetsession - विरोधकांची एकजूट, राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर बहिष्कार....
X

संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. पण त्याआधी विरोधकांनी एकजूट करत सरकारला घेरण्याची तयारी केली आहे. बजेट अधिवेशनापूर्वी राष्ट्रपतींचे दोन्ही सभागृहांना उद्देशून अभिभाषण होत असते. शुक्रवारी होणाऱ्या या अभिभाषणावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना या पक्षांसह देशभरातील १६ पक्षांनी एक संयुक्त निवेदन जारी करत बहिष्काराची घोषणा केली आहे. शेतकरी आंदोलनाबाबत केंद्र सरकारने दाखवलेल्या असंवेदनशीलतेचा निषेध करत हा बहिष्कार टाकण्यात येत असल्याचे विरोधकांनी म्हटले आहे.

या निवेदनामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, तृणमूल काँग्रेस, नॅशनल कॉन्फरन्स, डीएमके, समाजवादी पार्टी, राष्ट्रीय जनता, सीपीआयएम, सीपीआय, पीडीपी, केरळ काँग्रेस या पक्षांचा यात समावेश आहे. आता तर विरोधकांनी अभिभाषणावर बहिष्कार टाकला आहे. पण यावरुनच अधिवेशनात सरकारला घेरण्यासाठी विरोधक सज्ज आहेत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, ढासळती अर्थव्यवस्था असेल या सगळ्यांवरुन सरकारची कोंडी करण्याचा रणनीती विरोधकांची आखल्याचे दिसते आहे.

Updated : 28 Jan 2021 8:05 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top