विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधक आक्रमक
X
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लांबलेले राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. केवळ दोन दिवस हे अधिवेशन होणार आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक होत सरकारवर हल्लाबोल केला. विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर घोषणाबाजी केली वीजबिलाचा मुद्दा असो की शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा अधिवेशन केवळ दोन दिवसाची असल्याने जनतेच्या प्रश्नावर चर्चा करण्यात वेळ मिळणार नाही असा आक्षेप घेत विरोधकांनी आज जोरदार घोषणाबाजी आणि नारेबाजी केली आहे.
मुख्यमंत्री रशिया आणि प्रदेशाचा संदर्भ देतात परंतु महाराष्ट्रातील करून स्थिती बिकट असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला. मंत्र्यांच्या बंगल्यांच्या सुशोभीकरण याबाबत विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी हा मुद्दा अधिक महत्त्वाचं असल्याचं सांगितलं सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी तर बंगले हे मंत्र्यांचे नसून सरकारचे आहेत असं सांगितलं. अधिवेशनामध्ये तारांकित प्रश्नांवर चर्चा होणार नाही परंतु पहिल्याच दिवशी अर्थसंकल्पीय पुरवणी मागण्या आणि विधेयक सरकारने चर्चेसाठी मांडले आहेत गोंधळ झाला नाही तर कामकाज उशिरापर्यंत चालेल असं दिसत आहे.