Home > News Update > मराठा समाजातील मुलींसाठी 50 खटांच्या वसतीगृहाचे लोकार्पण

मराठा समाजातील मुलींसाठी 50 खटांच्या वसतीगृहाचे लोकार्पण

ठाण्यातील माजीवडा येथील डॉ पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृह या 50 बेडच्या मुलींच्या वसतिगृहाचे लोकार्पण नुकतेच पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले

मराठा समाजातील मुलींसाठी 50 खटांच्या वसतीगृहाचे लोकार्पण
X

ठाणे:राज्यातील मराठा विद्यार्थ्यांसाठी ठाण्यात पालिकेच्या वतीने तयार करण्यात आलेले वसतिगृह आता मुलींसाठी देण्यात येणार आहे.तर भविष्यात पालिकेच्या मालकीचे असणाऱ्या घोडबंदर रोड वर 100 रुमचे वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी दिल जाईल असं राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे. ठाण्यातील माजीवडा येथील डॉ पंजाबराव देशमुख मराठा विद्यार्थी वसतिगृह या 50 बेडच्या मुलींच्या वसतिगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावेळी ते बोलत होते.

सदरचा वसतिगृहाची जागा ही सुरक्षित ठिकाणी असल्याने हे वसतिगृह मुलींसाठी देण्यात आले असून घोडबंदर रोड वरील 100 बेडचे मुलांसाठी वसतिगृह देखील लवकरच उपलब्ध होईल असं शिंदे यांनी बोलताना स्पष्ट केलं. या वसतिगृहात मराठा विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व सोयीसुविधा मिळतील याची संबंधित प्रशासनाने काळजी घेतली असल्याचे देखील शिंदे यांनी सांगितले. पालिकेच्यावतीने हे वसतिगृह बांधून जिल्हाधिकारी कार्यलयाला हस्तांतरित करण्यात आले आहे.

दरम्यान कार्यक्रमावेळी झालेल्या गोंधळाबद्दल पत्रकारांनी विचारले असता. मराठा समाज अतिशय संयमी आहे. लाखोंच्या संख्येने मराठा समाजाने काढलेला मोर्चा अवघ्या राज्याने बघितला आहे. या वसतिगृहाचा फायदा हा मराठा समाजातील विद्यार्थ्यांनाच होणार आहे. मराठा समाजाने एकजुटीने राहिल्यास निच्छित मराठा समाजाच्या लढ्याला येत्या काळात यश मिळेल असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Updated : 16 Aug 2021 11:08 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top