Home > News Update > NDA मध्ये तीनच पक्ष शिल्लक - उद्धव ठाकरे

NDA मध्ये तीनच पक्ष शिल्लक - उद्धव ठाकरे

NDA मध्ये तीनच पक्ष शिल्लक - उद्धव ठाकरे
X

शिवसेनेच्या फुटीला एक वर्ष पुर्ण झाले. शिवसेनेच शिंदे गट तर ठाकरे गट असे हे दोन गट पडले. याच पार्श्वभूमीवर देशात चालू असणाऱ्या घडामोंडीवर उबाठा गटाने 'आवाज कुणाचा'पॉडकास्ट मुलाखतींची सुरुवात केली होती दरम्यान या मुलाखतीत उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुलाखत दिली. यावेळी त्यांनी या मुलाखतीतून पंतप्रधान नेरेंद्र मोदी आणि मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाना साधला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणालेत की काही वेळा आपली फसगत होते. ज्यांना आपण आपलं मानतो ती बांडगुळं निघतात. तरीदेखील ती आपल्यासोबत आहेत असं आपल्याला वाटत राहतं, पण प्रत्यक्षात ती त्या फांदीवरती मूळ वृक्षाचा रस शोषत असतात. वृक्षाला वाटतं, हे आपल्याच सोबत आहेत. अशा पद्धतीने त्यांनी शिंदे गटावर टीका केली.

दरम्यान ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कामावर ही प्रश्नचिंन्ह उपस्थित केला आहे. ते म्हणालेत की निवडणूक आयोगाचं काम हे निवडणूक निशाणी किंवा चिन्ह देण्याचं आहे. पक्षाचं नाव देण्याचं किंवा पक्षाचं नाव बदलण्याचं नाही. म्हणून आता जो विचित्र निकाल निवडणूक आयोगाने दिलेला आहे त्याविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात गेलोय आणि मला खात्री आहे की, ज्या पद्धतीनं सर्वोच्च न्यायालयात आपली बाजू मांडताना ज्या गोष्टींची पूर्तता करण्याची आवश्यकता होती त्या सर्व गोष्टींची पूर्तता आपण केली आहे आणि ती पूर्तता केल्यामुळेच मला खात्री आहे की, 'शिवसेना' हे नाव आपल्याला पुन्हा मिळेल असा ठाकरे यांनी विश्वास दाखवला आहे

केंद्र सरकारवर टीका करत असताना अ ठाकरे म्हणाले की बऱ्याच वर्षांनंतर या देशात 'एनडीए' नावाचा काहीतरी अमिबा जिवंत आहे हे कळलं आणि आपण जे देशभक्त राजकारणी आहोत त्यांची 'इंडिया' नावाची एक आघाडी केलेली आहे त्याला उत्तर देण्यासाठी त्याच दिवशी आपल्या माननीय पंतप्रधानांनी एकदम आपल्या आठवणीतल्या गोष्टी बाहेर काढल्या ठेवणीतल्या. आणि छत्तीस पक्षांची जेवणावळ त्यांनी घातली. खरं म्हणजे, छत्तीस पक्षांची त्यांना गरज नाहीय. त्यांच्या 'एनडीए'मध्ये आता ईडी, इन्कम टॅक्स आणि सीबीआय हे तीनच पक्ष मजबूत आहेत. असा टोलाही केंद्र सरकार ला लगावला आहे.

जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत. जी माझ्या सभोवती अगदी मूठभर का असतील, पण निष्ठावान असतील अशीच माणसं मला हवीत. कारण तीच खरी शक्ती असते. पसाभर गद्दार घेऊन फिरण्यापेक्षा मूठभर निष्ठावंत मला नेहमीच आवडतात. असंही ठाकरे म्हणालेत ते पुढे म्हणाले की शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षांत मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली लोकं म्हणताहेत की जे तुमच्यासोबत घडलं ते अयोग्य आहे. ही संस्कृती, हा संस्कार महाराष्ट्राचा नाही. तुम्ही काळजी करू नका. आम्ही सोबत आहोत. म्हणजे मला लोकांना काही सांगावंच लागत नाहीय असही उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले आहेत.







Updated : 26 July 2023 12:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top