Home > News Update > ठाण्यात यंदाही ''ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा''

ठाण्यात यंदाही ''ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा''

ठाण्यात यंदाही ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा
X

ठाणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गणेश विसर्जनाच्यावेळी गर्दी होवू नये यासाठी ठाणे महापालिकेच्या डिजीठाणे प्रणालीद्वारे यावर्षीही ''ऑनलाईन गणेश विसर्जन टाईमस्लॅाट बुकिंग सुविधा'' राबविण्यात येत असून 1 सप्टेंबर पासून सुरु होणाऱ्या बुकिंग सुविधेचा नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोरोनाच्या अनुषंगाने यावर्षीही शहरातील सार्वजनिक व घरगुती गणेशोत्सव शांततेत, सलोख्यात व सुरक्षित पद्धतीने साजरा करण्यासाठी महापालिका यंत्रणा विविध उपाययोजना करीत आहेत. त्या अनुषंगाने ठाणे महानगरपालिका क्षेत्रात गणेशमूर्ती विसर्जनासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत ऑनलाईन टाइमस्लॉट बुकिंग सुविधा यावर्षीही उपलब्ध करून देण्यात येत आहे. गेल्या वर्षी या उपक्रमाला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून जवळपास 11 हजार पेक्षा जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेतला आहे.

यावर्षी गणेश विसर्जनासाठी ठाणे महानगरपालिकेकडून एकूण 40 ठिकाणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. त्यामध्ये 7 घाट, 13 कृत्रिम तलाव आणि 20 स्वीकृती केंद्र यांचा समावेश आहे. सदर ठिकाणी श्रींचे विसर्जन करण्यासाठी डिजीठाणे प्रणाली मार्फत तयार केल्या गेलेल्या www.ganeshvisarjan.covidthane.org या संकेतस्थळावर विसर्जनाचा टाईमस्लॉट बुक करावा. असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Updated : 30 Aug 2021 8:04 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top