भारतातील यूएपीए (UAPA)कायद्याची अंमलबजावणी चिंताजन : संयुक्त राष्ट्र
X
Unlawful activities (prevention) act (UAPA) अर्थात बेकायदा कारवाई विरोधी कायद्याची सध्या भारतात होत असलेली अंबलबजावणी चिंताजनक असल्याचे संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्त मिशेल बॅचलेट यांनी म्हटलं आहे.
जम्मू काश्मिर राज्यातील सध्याच्या परीस्थितीचा संदर्भ देत मिशेल बॅचलेट म्हणाल्या, Unlawful activities (prevention) act (UAPA) अंतर्गत सर्वाधिक खटले जम्मु कश्मिर राज्यात दाखल झाले आहेत. या कायद्याचा वापर करुन अनेक पत्रकारांना अटक करण्यात आले आहे. हा एका दृष्टीने अभिव्यक्ती स्वातंत्र्यांची गळचेपी असल्याचं मिशेल बॅचलेट यांनी म्हटलं आहे.
एकत्र येण्यावर असलेले निर्बंध, वारंवार दुरसंचार सुविधांची बंदीमुळं जम्मु काश्मिरमधे अखंख्य लोकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेतलं जात असून पत्रकारांवरही मोठा दबाव येत असल्याबद्दल संयुक्त राष्ट्र मानवाधिकार उच्चायुक्तानं चिंता व्यक्त केली आहे.