Home > News Update > अॅड. गुणरत्न सदावर्तेवर बीडमध्ये गुन्हा दाखल..

अॅड. गुणरत्न सदावर्तेवर बीडमध्ये गुन्हा दाखल..

अॅड. गुणरत्न सदावर्तेवर बीडमध्ये गुन्हा दाखल..
X

वादग्रस्त वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर एकापोठापाठ एक गुन्हे दाखल होत असून मराठा समाजाच्या बद्दल अपशब्द वापरल्याने गुणरत्न सदावर्ते वर बीडमधे गुन्हा दाखल झाला आहे.

मराठा आरक्षणाविषयी तसेच मराठा समाज बांधवांच्या मोर्चाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने ॲड गुणरत्न सदावर्ते यांच्यावर आज 17 एप्रिल रविवार रोजी बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे .

भाजपचे बीड तालुकाध्यक्ष ॲड.स्वप्नील गलधर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादी नुसार, 15 एप्रिल रोजी सकाळी 10 वाजता ते स्वराज्यनगर येथे घरी होते . यावेळी एका डॉक्टरांनी व्हॉटसअपवर पाठविलेला व्हिडिओ त्यांनी डाऊनलोड करुन पाहिला . त्यात गुणरत्न सदावर्ते यांनी एका पत्रकार परिषदेत मराठा आरक्षणाबद्दल अपशब्द वापरल्याचे निदर्शनास आले . मराठा आरक्षण हे मोगलाई पध्दतीने लुटले जाऊ शकत नाही . पाटीलकी , देशमुखी , राजेशाहीचे राज्य नाही . महागड्या गाड्या आणून लोक जमवले व 52 मोर्चे काढले .

मुख्यमंत्र्यांना वेठीस धरुन आरक्षण मिळत नाही . अखेर सुप्रिम कोर्टाने अँटी व्हायरस देऊन आरक्षण नेस्तनाबूत केले. याशिवाय दिलीप पाटील यांच्या फेसबुक पेजवरील एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अड . सदावर्ते यांनी महापुरुषांविषयी आक्षेपार्ह विधान केल्याचे निदर्शनास आले . समाजात तेढ निर्माण करण्यासाठी तसेच मराठा समाजाच्या धार्मिक श्रध्दांचा अवमान करुन भीती पसरविल्याचा ठपका ठेऊन कलम 153 ( ए ) , 295 ( ए ) , 505 ( 2 ) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला . तपास सपोनि अमोल गुरले करत आहेत.











Updated : 17 April 2022 7:26 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top