Gautami Patil च्या कार्यक्रमात चेंगरा चेंगरी, एकाचा मृत्यू
काही दिवसांपुर्वी अश्लिल डान्स स्टेप्स मुळे चर्चेत आलेली नृत्यांगना गौतमी पाटील हीच्या कार्यक्रमात एकाचा अपघाती मृत्यू झाला आहे. मिरज मधील एका गावात तिच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी झालेल्या गर्दीत चेंगरून एकाचा मृत्यू झाला आहे.
X
मिरज तालुक्यातील बेडग या गावात गजराज कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या वतीने सत्कार समारंभाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सोशल मीडियातून प्रसिद्ध झालेली नृत्यांगना गौतमी पाटील हीच्या लावणी नृत्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला होता. हा कार्यक्रम बेडग येथील शाळेच्या प्रांगणात सुरू असताना काही प्रेक्षक शाळेच्या छतावर बसून कार्यक्रम पाहत होते. अचानक ही कौलं खाली कोसळली त्यामुळे या गर्दीत दत्तात्रय विलास ओमासे (वय ४४) यांचा मृत्यू झाला. गर्दीमध्ये त्यांच्या डोक्याला जबर मार बसला होता. या गर्दीत चेंगराचेंगरी झाल्याने दत्तात्रय ओमासे यांचा मृत्यू झाला.
पालकमंत्री होते उपस्थित
विशेष म्हणजे या कार्यक्रमात सत्कार करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी उपस्थिती लावली होती. पण सत्कार समारंभ आटोपल्यानंतर ते निघून गेले होते.