सुनावणीच्या पहिल्याच दिवशी, आव्हाडांचा गौप्यस्फोट; कागदपञं झाली गहाळ
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदार अपाञतेची सुनावणी आज विधानसभेचे अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्या समक्ष पार पडत आहे. या प्रकरणी प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणीचा आज पहिलाच दिवस आहे. पण सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा तयार झालाय कारण जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष नोंदवताना त्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.
X
NCPआमदार अपात्रता सुनावणी : राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आज सुनावणी पार पडत आहे. आज राष्ट्रवादीच्या प्रकरणातील सुनावणीचा पहिलाच दिवस आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची साक्ष नोंदवण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांची उलटसाक्ष नोंदवण्याचा प्रयत्न केला. शरद पवार गटाच्या वकिलांनीसुध्दा जितेंद्र आव्हाड यांना काही प्रश्न विचारले असता काही प्रश्नांवर दोन्ही गटाच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
सुनावणीच्या पहिल्याच दिवशी मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. कारण वकीलांकडून पक्षांतर्गत निवडणुका झाल्या होत्या का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला असता त्यावर त्यांनी झाल्या होत्या, असं उत्तर दिलं पण त्याची कागदपत्रे आणि पुरावे एका बंद कपटात ठेवण्यात आले होते. ते गायब झाल्याचं स्पष्टीकरण जितेंद्र आव्हाड यांनी दिलं.
पक्षाच्या अंतर्गत निवडणूक झाली त्यावेळी कपाटात हे कागदपत्र ठेवण्यात आले होते. विशेष म्हणजे जबाबदारी देण्यात आलेल्या दोन माणसांनी ते गहाळ केले. संबंधित माणसं पक्ष सोडून गेले आहेत. त्यांनी या कागदपत्रांचे म्हणजे पुराव्यांचा काय केलं माहिती नाही असं मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी आजच्या सुनावणीत केला. त्यामुळे आता ही सुनावणी कोणत्या स्तरावर जाते ते बघणं जास्त महत्त्वाचं ठरणार आहे.