Home > News Update > महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल

महापरिनिर्वाण दिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी दाखल
X

Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Din : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी दादरच्या चैत्यभूमीवर मोठ्या संख्येने अनुयायी

दाखल झालेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्यात. दरम्यान चैत्यभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

आज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त 8 उपनगरीय विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत. आज मध्य रेल्वे, मुंबई विभाग मेन लाईनवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कल्याण विभाग आणि हार्बर मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पनवेल या दोन्ही उपनगरीय विभागांवर मेगा ब्लॉक होणार नाही, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

Updated : 6 Dec 2021 8:24 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top