Home > Election 2020 > स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांवर भ्रष्टाचाराचे स्टीकर !

स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांवर भ्रष्टाचाराचे स्टीकर !

स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांवर भ्रष्टाचाराचे स्टीकर !
X

शासकीय आदिवासी वसतिगृहांना पुरवठा करण्यात आलेल्या पुस्तकांवर वाढीव किंमतीचे स्टीकर चिकटवून आर्थिक अपाहार केला गेल्याचा प्रकार किनवट एकात्मिक आदिवासी प्रकल्पात उघडकीस आला आहे.

किनवट येथील एकात्मिक आदिवासी प्रकल्प अंतर्गत 15 शासकीय आदिवासी वसतिगृहांना स्पर्धा परीक्षांची पुस्तके पुरंवण्यात आली आहेत. नांदेड जिल्हा ग्रंथालय अधिकार्यांमार्फत प्रत्येक वसतिगृहाला 2 लाख याप्रमाणे एकूण 30 लाखांची पुस्तके वितरित करण्यात आली. या कामाची उलट तपासणी आदिवासी विकास निरीक्षकांनी केली तेंव्हा त्यांना काही पुस्तकांवर किंमतीवर स्टीकर चिकटवलेले आढळले. मूळ किंमतीपेक्षा हे स्टीकर वाढीव रकमेचे होते.

त्यातली तफावत एकूण 86 हजार 250 रुपयांची होती. सदरची रक्कम पुरवठादाराकडून वसूल करण्याचे आदेश जिल्हा ग्रंथालय अधिकार्यां ना दिले गेल्यानंतर आता परतावा करण्यात आलाय. उत्तर नांदेड क्षेत्राचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी या संदर्भात विधानसभेत प्रश्न विचारल्यावर उत्तरात संबंधित मंत्री एड. के सी पाडवी यांनी सदरचा अपहार झाल्याचे मान्य केले आहे.

मात्र, या गैरप्रकाराला जबाबदार कोण, त्यांच्यावर काय कारवाई झाली, याचे मात्र उत्तर मंत्रीमहोदयांनी दिलेले नाही, त्याबद्दल आपण सरकारला जाब विचारणार आहोत, असे आमदार बालाजी कल्याणकर यांनी मॅक्स महाराष्ट्र ला सांगितले.

Updated : 13 March 2020 11:45 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top