Home > News Update > रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अयोध्येत भक्तांची गर्दी....६लाखाच्या वर भाविक पोहोचले

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अयोध्येत भक्तांची गर्दी....६लाखाच्या वर भाविक पोहोचले

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर अयोध्येत भक्तांची गर्दी....६लाखाच्या वर भाविक पोहोचले
X

रामनवमीच्या शुभमुहूर्तावर आज दुपारी अयोध्येत १२ वाजल्यापासून रामलल्लाचा सूर्यतिलक सुरू झाला. अयोध्येत रामलल्लाच्या प्रतिष्ठापणेनंतर हे पहिले सूर्यतिलक आहे. दुपारी १२ वाजता अभिजीत मुहूर्तावर ३ मिनिटांसाठी रामलल्ला सूर्यतिलक करण्यात आला.

या विधीसाठी २० अष्टधातूच्या पाईपांपासून ६५ फुट लांबीची मोठी यंत्रणा तयार करण्यात आली आहे. यामध्ये गर्भगृहातून रामलल्लाच्या मस्तकावर ४ लेन्स आणि ४ आरशांद्वारे किरण पाठवण्यात आले.

रामलल्ला सदन येथे रामजन्मोत्सव सुरु झाला आहे. जगद्गुरु राघवाचार्य यांनी रामलल्ला यांचा ५१ कलशांनी अभिषेक केला. रामनवमीच्या या भव्य सोहळ्याला आतापर्यंत ६ लाखांपेक्षा अधिक भाविक अयोध्येत पोहोचले आहेत. रामजन्मभूमी संकुलात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. रामपथ, भक्तीपथ आणि जन्मभूमी मार्गावर मोठी गर्दी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यासंदर्भात आपल्या एक्स अकाऊंटवरून पोस्ट शेअर करत म्हणाले की, शतकानुशतके वाट पाहिल्यानंतर अयोध्येत रमानवमी साजरी करण्याचे भाग्य मिळाले. हे देशबांधवांचा इतक्या वर्षाचा त्याग, तपस्या, आणि बलिदानाचा परिणाम आहे, असं पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.


Updated : 17 April 2024 1:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top