Home > News Update > कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांचा धावत्या रुग्णवाहिकेतच मृत्यू

कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांचा धावत्या रुग्णवाहिकेतच मृत्यू

कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांचा धावत्या रुग्णवाहिकेतच मृत्यू
X

रूग्णवाहिकेत अनेकदा आपण रूग्णाचे जीव जाताना पाहतो. पण डॉक्टरांसोबत असं झालं तर... बुलढाण्यात रूग्णवाहिकेत रूग्णावर उपचार करत असताना अचानक एका डॉक्टराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. डॉ. ओमप्रकाश सूर्यवंशी अस मृत्यू झालेल्या डॉक्टरचं नाव आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा प्राथमिक आरोग्य केंद्रात आकस्मित सेवेसाठी असलेली १०८ रुग्णवाहिकेमध्ये कर्तव्यावर असलेल्या डॉक्टर ओमप्रकाश सूर्यवंशी यांच मध्यरात्री एका गंभीर रुग्णाला घेण्यासाठी जात असताना धावत्या रुग्णवाहिकेत मृत्यू झाला आहे. मध्यरात्री डॉ.सूर्यवंशी यांना एका रुग्णाचा फोन आल्याने ते रुग्णवाहिका चालक यांना घेऊन रुग्णाच्या घरी जात असताना अचानक धावत्या रुग्णवाहिकेत त्यांची तब्येत बिघडली. तात्काळ रुग्णवाहिका चालकाने प्रसंगावधान ठेऊन त्यांना खामगाव सामान्य रुग्णालयात आणले पण तोपर्यंत डॉ.सुर्यवंशी यांचा मृत्यू झाला होता.


ही माहिती सदर रुग्णवाहिका संचालन करणाऱ्या भारत विकास ग्रुपच्या वरिष्ठ अधिकारयांना देण्यात आली. पण 12 तास उलटून गेल्यावरही संबंधित कंपनीचे जिल्ह्याचे प्रबंधक अजिंक्य लवंगे यांनी अजूनही याठिकाणी भेट दिली नसल्याने डॉ.ओमप्रकाश सूर्यवंशी यांचे नातेवाईक, 108 रुग्णवाहिकेचे चालक व डॉक्टर्स यांनी संताप व्यक्त केलाय. जो पर्यंत भारत विकास ग्रुप कंपनीचे अधिकारी या ठिकाणी येणार नाहीत तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. भारत विकास ग्रुप कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तणावाला डॉ. सूर्यवंशी बळी पडल्याचा आरोप यावेळी कर्मचारी करत आहे. अजूनही मृतदेह सामान्य रुग्णालयात पडून आहे.

Updated : 21 Aug 2022 2:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top