Home > News Update > राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव; डोंबिवली पाठोपाठ पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही आढळले रुग्ण

राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव; डोंबिवली पाठोपाठ पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही आढळले रुग्ण

राज्यात ओमिक्रॉनचा फैलाव; डोंबिवली पाठोपाठ पुण्यासह पिंपरी चिंचवडमध्येही आढळले रुग्ण
X

ओमिक्रॉन कोविड विषाणुनं जगभर भिती निर्माण केली असताना आता महाराष्ट्रातही एकुण बधित रुग्णाची संख्या आठ झाली आहे. कल्याण डोंबिविलीत शनिवारी ओमिक्रॉन या करोनाच्या नव्या व्हेरिएंटचा (Corona New Variant) एक रुग्ण आढळल्याने या विषाणूचा राज्यात शिरकाव झाल्याचं स्पष्ट झालं होतं. त्यानंतर आता पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळले आहेत. पुणे शहरात एक तर पिंपरी चिंचवडमध्ये सहा असे एकूण सात रुग्ण पुणे जिल्ह्यात आढळले आहेत. त्यामुळे ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या राज्यात आठपर्यंत पोहोचली आहे.

पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये आढळलेल्या ओमिक्रॉन रुग्णांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे. काल डोंबिवलीत ओमिक्रॉनचा पहीला रुग्ण आढळला होता. नायजेरिया देशातील लेगॉस शहरातून भावाला भेटण्यासाठी आलेली ४४ वर्षांची महिला, तिच्यासोबत आलेल्या दोन मुली आणि पिंपरी चिंचवड शहरात राहणारा तिचा भाऊ आणि त्याच्या दोन्ही मुली अशा एकूण सहा जणांच्या प्रयोगशाळा नमुन्यांमध्ये 'ओमिक्रॉन' विषाणू सापडल्याचा अहवाल पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने (एनआयव्ही) ने दिला आहे. त्यामुळे राज्यातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची एकूण संख्या आठपर्यंत पोहोचली आहे.दरम्यान, ओमिक्रॉन या करोनाचा नवा व्हेरिएंट आधीच्या इतर व्हेरिएंटपेक्षा अधिक घातक असला तरी चिंता करण्याची गरज नाही असं तज्ज्ञांकडून सांगण्यात आलं आहे.

Updated : 6 Dec 2021 8:16 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top