Home > News Update > ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ; IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित

कानपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संशोधकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात अभ्यास केला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार आहे.

ओमायक्रॉनमुळे भारतात कोरोनाची तिसरी लाट येणार ;  IIT च्या संशोधकांनी व्यक्त केले भाकित
X

मुंबई// जगभरात ओमायक्रॉनचे संकट गडद होत असताना भारतामध्येही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यातच नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी टाकळण्यासाठी अनेक राज्यात निर्बंध लागू करण्यात आलेत. त्यातच आता ओमायक्रॉनमुळे कोरोनाची तिसरी लाट देशामध्ये येणार का ? याबाबत चर्चा सुरु झाल्यात.

कानपूरमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी संशोधकांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात अभ्यास केला आहे. संशोधकांच्या म्हणण्यानुसार ओमायक्रॉन विषाणूचा प्रादुर्भावामुळे देशात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येणार आहे. 3 फेब्रुवारीपर्यंत कोरोनाच्या या तिसऱ्या लाटेमध्ये रुग्णसंख्येचा उच्चांक गाठला जाऊ शकतो असं संशोधकांनी म्हटले आहे. हा निष्कर्ष गॉजियन मिक्सर मॉडल या स्टॅटिस्टीकल टूलच्या माध्यमातून काढण्यात आला आहे. कोरोनाची तिसरी लाट फेब्रुवारीच्या सुरुवातीच्या आठवड्यात सर्वाधिक उंच्चाकावर असेल असं अहवालात म्हटले आहे.

संशोधकांनी भारतामधील कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेदरम्यानची आकडेवारी आणि सध्या वेगवेगळ्या देशांत असणाऱ्या ओमायक्रॉनच्या रुग्णसंख्येच्या आधारे माहिती गोळा करुन निष्कर्ष काढला आहे.

Updated : 24 Dec 2021 8:54 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top