अधिकाऱ्यांनो जनतेचे काम करा अन्यथा मलिदा खा...! सोलापूरात प्रहारचे अनोखे आंदोलन
X
प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यात अनोखे आंदोलन करण्यात आले मंगळवेढा तालूक्यातील भोसे, लोणार, मानेवाडी, सलगर येथील ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मंगळवेढा येथील पंचायत समिती कार्लयाबाहेर मलिदा वाटप आंदोलन करण्यात आले.
काय आहेत आंदोलकांच्या मागण्या ?
मंगळवेढा तालूक्यातील भोसे, लोणार, मानेवाडी, सलगर या शाळेत शिक्षक नेमावेत
भोसे, सलगर ,बोराळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात (CCTV)कॅमेरे व बायोमेट्रिक मशीन बसवावी
तालुक्यातील ग्रामपंचायत कार्यालयातील बायोमेट्रिक मशीन सूरू कराव्यात
कृषी सहाय्यकांना ग्रामपंचायतीमध्ये बसण्यास जागा उपलब्ध करुन देण्यात यावी
आदी प्रमुख मागण्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने केल्या असून यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख राजेंद्र सावंत, कार्याध्यक्ष आमोगसिद्ध काकणकी, तालुका अध्यक्ष राजकुमार स्वामी सिद्धु काकणकी, सुभाष गरंडे, सर्जेराव गाडे, निसार पाटील ,नाना बिचुकले, रमजान पाटील, युवा नेते प्रसाद कसबे, दिगंबर गरंडे , ढोणे सर, अशोक माने, सिद्धेश्वर पाटील, चेतन वाघमोडे, प्रकाश मेटकरी, नवनाथ शिरसाटकर, महेश तळ्ळे, रविकांत जाधव, काशिनाथ मळगे, मारुती मळगे, बबलू बाबर, उषा बंडगर, सारिका कवचाळे, सविता मोहिते, स्वाती गरंडे, अशोक सुतार, तसेच इतर पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.