Home > News Update > शरद पवारांच्या आजाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट; राष्ट्रवादीची सायबर सेलकडे तक्रार

शरद पवारांच्या आजाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट; राष्ट्रवादीची सायबर सेलकडे तक्रार

शरद पवारांच्या आजाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट; राष्ट्रवादीची सायबर सेलकडे तक्रार
X

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पोटात वेदना जाणवल्यानं त्यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. या दरम्यान पवार यांच्या या आजारपणाबाबत सोशल मीडियावर काही विकृत लोकांनी हीन दर्जाच्या पोस् लिहिल्या होत्या. या पोस्ट करणाऱ्या लोकांच्या विरोधात आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुंबई सायबर क्राईमकडे तक्रार केली आहे.

यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी माध्यमांशी बातचीत केली. ते म्हणाले…

 भाजपा आणि त्यांच्या समर्थकांनी टीकेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. ५० वर्ष या राज्याचा भार समर्थपणे वाहणाऱ्या आणि आमच्यासाठी आमचा मान,स्वाभिमान असणाऱ्या साहेबांवर केलेली ही टीका अतिशय जिव्हारी लागणारी आहे. त्यामुळेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सहकाऱ्यांनी या विकृत आणि समाजकंटक लोकांविरोधात सायबर क्राईमचे एसपी शिंत्रे यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.


असं त्यांनी सांगितलं.

त्यानुसार पोलिसांनी भादंवि कलम १५३ अ, ५०५(२), ५००,५०४,४६९,४९९,५०७,३५, IT act ६६ (D) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Updated : 1 April 2021 5:13 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top